Hardik Patel's father Dies of Covid-19: काँग्रेस नेते हार्दिक पटेल यांच्या वडिलांचे करोनामुळे निधन
Hardik Patel (Photo Credit: Twitter)

भारतात सध्या कोरोनाच्या (Coronavirus) दुसऱ्या लाटेने थैमान घातलेले आहे. दररोज चार लाखांच्या आसपास नवीन कोरोनाबाधित आढळून येत आहेत. अनेक राज्यांमधील परिस्थिती चिंताजनक आहे. गुजरात (Gujarat) काँग्रेसचे कार्यकारी अध्यक्ष हार्दीक पटेल (Hardik Patel) वडील भरत पटेल (Bharat Patel) यांचे कोरोनामुळे झाले आहे. भरत पटेल यांच्यावर अहमदाबादमधील एका रुग्णालयात उपचार सुरु होते. मात्र, आज (9 मे) उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला आहे. हार्दिक पटेल यांच्या वडिलांच्या निधनावर अनेक राजकीय नेत्यांनी शोक व्यक्त केला आहे.

दरम्यान, हार्दिक पटेल हे देखील कोरोनाच्या जाळ्यात अडकले आहेत. हार्दिक पटेल यांनी 2 मे रोजी त्यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती दिली होती. यावेळी ते म्हणाले होते की, माझी कोरोना चाचणी सकारात्मक आली आहे. मी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार घरीच कोरोनावर उपचार घेत आहे. तुमचे प्रेम आणि प्रार्थनाने लवकरच कोरोनावर मात करेल, असे ट्विट त्यांनी केले होते. हे देखील वाचा- आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताची नाचक्की; देशातील Covid-19 परिस्थितीसाठी फक्त मोदी सरकारच जबाबदार असल्याचे The Lancet चे मत

गुजरातमध्ये गेल्या 24 तासात 11 हजार 892 जणांना करोनाची लागण झाली आहे. तर, 119 जणांचा मृत्यू झाला आहे. यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या 6 लाख 69 हजार 928 वर पोहचली आहे. यापैकी 8 हजार 273 जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या राज्यात 1 लाख 43 हजार 421 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.