Representational Image (Photo Credits: PTI)

Gujarat Fire: गुजरात (Gujarat) राज्यातील बडोदा (Vadodara) येथील ऑक्सिजन प्लान्टमध्ये भीषण स्फोट झाल्याची घटना घडली आहे. या स्फोटात 6 जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार, बडोद्यातील एआयएमएस इन्स्टिट्युट प्रा. लि. (AIMS Industrial Private Limited) येथे ऑक्सिजन प्लान्टला भीषण आग लागली. या स्फोटात 6 जणांचा मृत्यू झाला. अद्याप आगीचे कारण समजू शकलेले नाही. सध्या या आगीत जखमी झालेल्यांची प्रकृती गंभीर आहे. त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. (हेही वाचा - उत्तर प्रदेशमधील कन्नौज येथे ट्रक-बसच्या धडकेत 20 जणांचा मृत्यू, तर 21 जण जखमी)

देशात दररोज विविध ठिकाणी आग लागण्याच्या घटना घडतात. उत्तर प्रदेशमधील कन्नौज येथे प्रवासी बस आणि मालवाहू ट्रक यांच्यात टक्कर होऊन मोठा अपघात झाला. या अपघातानंतर प्रवासी बसला भीषण आग लागली. या आगीत होरपळून 20 प्रवाशांचा मृत्यू झाला. बसला लागलेल्या आगीची तीव्रता इतकी होती की, प्रवाशांना बसमधून बाहेरही पडता आले नाही. त्यामुळे अनेक प्रवाशांना या अपघातात आपले प्राण गमवावे लागले आहेत. मागील महिन्यात दिल्लीमध्ये कारखान्याला भीषण आग लागल्याची घटना घडली होती. यात मोठी जीवितहानी झाली होती.