Swati Maliwal reacts On AAP's defeat (फोटो सौजन्य - फेसबुक)

Swati Maliwal's Reaction: दिल्ली विधानसभा निवडणुकीत (Delhi Election Result 2025) आम आदमी पक्षाला (AAP) मोठा पराभव सहन करावा लागला आहे. दरम्यान, आता राज्यसभा खासदार स्वाती मालीवाल (Swati Maliwal) यांची एक पोस्ट सोशल मीडियावर चांगलीचं व्हायरल झाली आहे. मालीवाल यांनी सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये हिंदू महाकाव्य महाभारतातील द्रौपदीचे 'वस्त्रहरण' दर्शविणारा फोटो शेअर करण्यात आला आहे. केजरीवाल यांच्या एकेकाळी जवळच्या सहकारी असलेल्या मालीवाल अलिकडच्या काळात त्यांच्या सर्वात जोरदार टीकाकारांपैकी एक म्हणून उदयास आल्या आहेत. दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्षा म्हणूनही काम करणाऱ्या मालीवाल यांनी जाहीरपणे केजरीवाल यांच्या नेतृत्वाबद्दल आणि त्यांच्या पक्षाच्या दिशानिर्देशांबद्दलचा त्यांचा भ्रमनिरास व्यक्त केला आहे.

महिलांविरुद्ध गुन्हे करणाऱ्यांना देव शिक्षा देतो -

याशिवाय, आपच्या पराभवानंतर स्वाती मालीवाल यांनी आपली प्रतिक्रिया नोंदवली आहे. त्यांनी म्हटलं आहे की, महिलांविरुद्ध गुन्हे करणाऱ्यांना देव शिक्षा देतो. तथापी, हे विधान 'आप'चे प्रमुख अरविंद केजरीवाल यांचे माजी वैयक्तिक सहाय्यक बिभव कुमार यांच्याशी संबंधित मारहाण प्रकरणावर असल्याचं दिसून येतं. मालीवाल यांनी बिभव कुमार यांनी त्याच्यावर हल्ला केल्याचा आरोप केला होता. (हेही वाचा - Delhi Election Result 2025: दिल्ली विधानसभा निवडणूकीत आपचा पराभव का झाला? कोणत्या प्रमुख कारणांमुळे दिल्लीकरांनी बदलला कौल? जाणून घ्या)

स्वाती मालीवाल यांची पोस्ट - 

दरम्यान, स्वाती मालीवाल यांनी यापूर्वी 'आप' आणि केजरीवाल यांच्यावर अनेकदा तोफ डागली आहे. परंतु, असं असलं तरी त्यांनी अद्याप पक्ष सोडलेला नाही. जर आपण इतिहास पाहिला तर कोणत्याही महिलेसोबत काही चूक झाली तर देवाने ते कृत्य करणाऱ्यांना शिक्षा केली आहे, असं मालीवाल यांनी म्हटलं आहे. (हेही वाचा - Delhi Election Result 2025: 'आप'ला मोठा धक्का! अरविंद केजरीवाल पराभूत; नवी दिल्ली विधानसभा मतदारसंघात प्रवेश वर्मांनी खुलवलं कमळ)

रावणाचा अभिमानही भंगला - स्वाती मालीवाल

स्वाती मालीवाल यांनी आपचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांच्यावर जोरदार हल्ला चढवला आहे. त्यांनी म्हटलं आहे की, रावणाचा अभिमानही भंगला आहे आणि आता ते फक्त केजरीवाल आहेत. तथापी, आगामी निवडणुकीत आपच्या संभाव्य पराभवाला कारणीभूत असलेल्या घटकांवर बोलताना, मालीवाल यांनी पाणी आणि वायू प्रदूषण, खराब पायाभूत सुविधा आणि मूलभूत सुविधांचा अभाव यासारख्या मुद्द्यांकडे त्यांच्या पराभवाची प्रमुख कारणे म्हणून लक्ष वेधले.