वाहतूक खरेदी करणाऱ्या ग्राहकांना सरकारचे मोठं गिफ्ट, नव्या गाड्यांवर रोड टॅक्समध्ये 50 टक्के घट
प्रातिनिधिक प्रतिमा (Photo Credits: Wikimedia Commons, Lakun.patra)

भारतीय ऑटोमोबाइल इंडस्ट्री सध्या आर्थिक मंदीच्या परिस्थितीतून जात आहे. त्यामुळे सातत्याने वाहन विक्रीत घट झाल्याने गेल्या काही महिन्यांपासून दिसून येत आहे. तर आता गोवा सरकारने या परिस्थितीवर तोडगा काढला असून 31 डिसेंबर पर्यंतच्या तीन महिन्याच्या कालावधीत कोणत्यासाठी नव्या वाहतूक खरेदीवर 50 टक्के रोड टॅक्स कपात करणार असल्याची घोषणा केली आहे.

मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी स्वत:हून ही माहिती दिली आहे. तर राज्यातील वाहतूक विभागाकडे जमा झालेल्या माहितीनुसार, नव्याने सुरु होणाऱ्या आर्थिक वर्षाच्या चार महिन्यांपूर्वी गोव्यातील वाहनांच्या रजिस्ट्रेशनमध्ये 15-17 टक्के घट झाली आहे. वाहतूक मंत्री मौविन गोडिन्हो यांनी असे म्हटले आहे की, एप्रिल ते जुलै महिन्यादरम्यान एकूण 19,480 वाहनांचे रजिस्ट्रेशन झाले आहे. दिवाळी सारख्या मोठ्या सणासह सरकारच्या या निर्णयामुळे ऑटो इंडस्ट्रिला फायदा होईल.

टॅक्स संबंधित बोलायचे झाल्यास सध्या 1.5 लाख रुपयांच्या गाडीवर 9 टक्के टॅक्स लावला जातो. तर 1.5 ते 3 लाख रुपयांच्या गाडीवर 12 टक्के आणि ज्या गाड्यांची किंमत 3 लाख रुपयांपेक्षा अधिक असते त्यावर 15 टक्के टॅक्सची आकारणी केली जाते. तसेच 6 लाखांवरील गाड्यांवर 9 टक्केसह 10 लाख रुपयापर्यंतच्या 11 टक्के टॅक्स लावला जातो. एवढेच नाही तर 15 टक्क्यांपेक्षा अधिक किंमतीच्या गाड्यांवर 13 टक्के टॅक्स स्विकारण्यात येतो.(भारतातील 'या' दिग्गज कार निर्माता कंपनीला लागले ग्रहण; गेल्या 9 महिन्यात फक्त 1 कार विकली गेली)

तसेच मारुती सुझुकीने सप्टेंबर महिन्यात 17.48 टक्क्यांनी त्यांच्या उत्पादनात कपात केली आहे. त्याचबरोबर प्रवासी वाहतूक करणाऱ्या उत्पादनात 17.37 टक्क्यांची घट केली . सध्या बाजारात वाहनांना मागणी नसल्यामुळे मारुती सुझुकीने त्यांच्या उत्पादनात घट केली. यात मिनी आणि कॉम्पॅक्ट सेगमेंटमध्ये मोडणाऱ्या Alto, New Wagon R, Celerio, Ignis, Swift, Baleno आणि Desire उत्पादनात मारुतीने 14.91 टक्क्यांनी कपात केली.