गोव्याचे पोलिस महासंचालक प्रणब नंदा यांचे दिल्लीत ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन
Goa Director General Pranab Nanda (PC - Twitter)

गोव्याचे पोलीस महासंचालक (Goa Director General) प्रणब नंदा (Pranab Nanda) यांचे शनिवारी मध्यरात्री 1 वाजता नवी दिल्लीत हृदय विकाराच्या झटक्याने निधन झाले. कार्यालयीन कामानिमित्त प्रणब नंदा हे दिल्ली येथे गेले होते. शनिवारी मध्यरात्री त्यांच्या हृदयात कळा येवू लागल्या. त्यानंतर त्यांना दिल्ली येथील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले. (हेही वाचा - ज्येष्ठ रंगकर्मी अरुण काकडे यांचे निधन, वयाच्या 89 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास)

गोवा पोलिसांना प्रणब नंदा यांच्या कुटुंबियांकडून त्यांच्या निधनाची माहिती देण्यात आली. 57 वर्ष नंदा हे 1988 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी होते. प्रणब यांनी गोव्याचे पोलिस महासंचालक म्हणून पदभार स्विकारून आणखी एक वर्षही उलटलं नाही. विशेष म्हणजे प्रणब नंदा यांच्या पत्नी सुंदरी नंदा याही आयपीएस अधिकारी आहेत. त्यांनी गोव्यामध्ये यापूर्वी पोलीस महानिरीक्षक म्हणून काम पाहिले आहे.

हेही वाचा - अतिवृष्टीमुळे राज्यात 90 लाख हेक्टर पिकांचे नुकसान; कृषी विभागाने वर्तवला अंदाज

दरम्यान, नंदा यांच्या आकस्मिक निधनामुळे धक्का बसल्याचे गोव्याचे पोलीस महानिरीक्षक जसपालसिंग यांनी म्हटले आहे. तसेच गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनीदेखील नंदा यांच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त केले आहे. नंदा यांच्या आकस्मित निधनामुळे त्यांच्या कुटुंबियांवर शोककळा पसरली आहे.