Goa Assembly Elections 2022: गोव्याचे माजी मुख्यमंत्री Laxmikant Parsekar यांचा तिकीट न मिळाल्याने BJP ला रामराम; अपक्ष लढण्याची तयारी
Former CM Laxmikant Parsekar | FB

गोवा विधानसभेची निवडणूक (Goa Vidhansabha Election) तारीख जाहीर होताच आता उमेदवार यादी जाहीर होण्यास सुरूवात झाली आहे पण गोवा भाजपा मध्ये उत्पल पर्रिकर यांच्यापाठोपाठ माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांना पक्षाला रामराम ठोकला आहे. काल उत्पल पर्रिकर यांनी पणजी मधून तिकीट न मिळाल्याने भाजपाला सोठचिठ्ठी दिली तर आज पहिल्या यादीमध्ये लक्ष्मीकांत पार्सेकर (Laxmikant Parsekar) यांचंही नाव नसल्याने त्यांनी भाजपा सोडत अपक्ष निवडणूक लढण्याची तयारी वर्तवली आहे. उत्पल पर्रिकर हे गोव्याचे माजी मुख्यमंत्री आणि देशाचे संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर यांचे सुपुत्र आहेत.

भाजपाने विद्यमान आमदार दयानंद सोपटे यांना उमेदवारी दिल्याने पर्सीकर नाराज असून त्यांनी पक्षाला रामराम ठोकला आहे. मीडीयाशी बोलताना त्यांनी मला पक्षाकडून पुर्नवसन नको, माझा जनतेवर पुर्ण विश्वास असल्याने मी भाजपाला सोडचिठ्ठी देत अपक्ष लढण्याचा निर्णय घेत आहे. लक्ष्मीकांत पार्सेकर मांद्रे विधानसभा मतदार संघात आहेत इच्छुक असल्याची गोव्यात चर्चा आहे.

आज संध्याकाळपर्यंत लक्ष्मीकांत पार्सेकर भाजपच्या सदस्यत्वाचा आणि जाहीरनामा समिती प्रमुख पदाचा राजीनामा देणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. दरम्यान गोवा मध्ये विधानसभा निवडणूक 14 फेब्रुवारी दिवशी आहे. तर निकाल 10 मार्च दिवशी लागणार आहे. Goa Assembly Election 2022: उत्पल पर्रीकरांनी भाजपला सोडचिठ्ठी दिल्यानंतर संजय राऊतांनी भाजपला लगावला टोला .

पर्सीकर यांच्याऐवजी ज्यांना तिकीट मिळाले आहे ते दयानंद सोपटे यांना पर्सीकर यांनी 2017 मध्ये निवडणूकीचे रिंगणार हरवलं होतं. तेव्हा ते कॉंग्रेस पक्षाकडून उभे होते पण 2018 मध्ये त्यांनी 9 अन्य नेत्यांसह भाजपामध्ये प्रवेश केला आहे. पर्सीकर 2014-17 गोव्याचे मुख्यमंत्री होते. मनोहर पर्रीकर यांची केंद्रीय मंत्रिमंडळात संरक्षणमंत्री म्हणून वर्णी लागल्यानंतर गोव्याची जबाबदारी पर्सीकर यांच्यावर आली होती.