प्रेमाच्या नादात महिला झाली पुरुष, प्रेयसीने दिला दगा
(संग्रहित आणि संपादित प्रतिमा)

सध्या प्रेमासाठी लोक काय उद्योग करतील याचा नेम नाही. तर काही  प्रेमी युगुलकांची जोडीसुद्धा खुलेआम प्रेम व्यक्त करताना दिसतात. अशीच एक घटना कोझीकोडे येथे घडली आहे. एका महिलेने प्रेमासाठी लिंग बदल करुन पुरुषत्व स्वीकार केले. मात्र प्रेयसीने मैत्रिणीला दगा देत दुसऱ्याबरोबर पळून जाण्याचा पराक्रम केला आहे.

केरळ मध्ये राहणारी अर्चना राज (दिपू नवीन नाव) या महिलेने प्रेयसीसाठी लिंग बदल केले. त्यासाठी दिपूने शस्रक्रिया करण्यासाठी 2 लाख रुपयांचे कर्ज काढून हे साध्य केले. त्यानंतर दिपूने प्रेयसीला अनेक वेळा फोन करण्याचा प्रयत्न केला. परंतु काही दिवसांनतर प्रेयसीने तिचे लग्न दुसऱ्या मुलासोबत ठरले असल्याचे सांगितले. या घटनेप्रकरणी दिपूला धक्का बसला आहे.

या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी दिपूने पोलिसांकडे धाव घेतली आहे. तसेच प्रेयसीवर अजून कोणतीही कारवाई करण्यात आलेली नसल्याचे दिपूने एका पत्रकार परिषदेत सांगितले.