प्रेम विवाह केल्याने मुलीचे जीवंतपणीच केले अंतिम संस्कार
प्रातिनिधिक प्रतिमा (Photo Credits: Facebook)

मध्य प्रदेशात एका तरुणीने प्रेमविवाह केल्याने तिच्या घरातील मंडळींनी चक्क तिच्या जीवंतपणी तिचे अंतिम संस्कार केल्याची विचित्र घटना घडली आहे. तसेच घरातील मंडळींनी ती आमच्यासाठी मेली असून तिची तिरटीवरुन अंतिम यात्रा गावभर काढली आहे.

झाबुआतील बोरी गावात बरिया कुटुंबातील कुसुम ही गेली काही दिवस हरवली होती. तसेच तिच्या घरातील मंडळींनी याबद्दल पोलिसात तक्रार केली होती. मात्र कुसुमने घरी कॉलेजला जाते असे सांगून  तिने एका तरुणाशी प्रेमविवाह केल्याचे तिच्या घरातील मंडळींना कळले. त्यावेळी घरातील

मंडळींना तो तरुण भाभरा गावातील नानू डांगी या खालच्या जातीतील मुलाशी लग्न केले होते. या कारणाने कुसुमच्या घरातील मंडळींनी संताप व्यक्त करुन तिचे जीवंतपणी अंतिम संस्कार केले आहे.

या प्रकरणी कुसुमच्या घरातील मंडळींसह नातेवाईक आणि गावतील मंडळींनी या अंतिम संस्कारासाठी उपस्थिती लावली होती. तसेच कुसुमच्या सर्व वस्तूंना अग्नी देऊन तिचे गावकऱ्यांना तेराव्याचे जेवणही दिले असल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे.