Close
Advertisement
 
मंगळवार, जानेवारी 21, 2025
ताज्या बातम्या
35 minutes ago

Ghaziabad School Bus Fire: गाझियाबादमध्ये मोठी दुर्घटना टळली, शाळकरी मुलांनी भरलेल्या बसला आग, सर्व सुखरूप, पाहा VIDEO

उत्तर प्रदेशातील गाझियाबादमध्ये आज पहाटे मुलांनी भरलेल्या स्कूल बसला आग लागली. ज्या बसमध्ये सुमारे 16 मुले प्रवास करत होती. बसला आग लागल्यानंतर एकच खळबळ उडाली होती. सुदैवाने आग लागताच चालकाने तात्काळ थांबवले आणि जवळच्या लोकांच्या मदतीने सर्व मुलांना बसमधून खाली उतरवले.

राष्ट्रीय Shreya Varke | Nov 14, 2024 12:42 PM IST
A+
A-
(Photo Credits ANI)

Ghaziabad School Bus Fire: उत्तर प्रदेशातील गाझियाबादमध्ये आज पहाटे मुलांनी भरलेल्या स्कूल बसला आग लागली. ज्या बसमध्ये सुमारे 16 मुले प्रवास करत होती. बसला आग लागल्यानंतर एकच खळबळ उडाली होती. सुदैवाने आग लागताच चालकाने तात्काळ थांबवले आणि जवळच्या लोकांच्या मदतीने सर्व मुलांना बसमधून खाली उतरवले. अन्यथा मोठी दुर्घटना घडू शकली असती. बसला आग लागल्याचा व्हिडिओही समोर आला आहे. बस जळत असल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. मात्र, आग लागल्यानंतर अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी पोहोचून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न करत आहेत. मात्र आग आटोक्यात येईपर्यंत बस जळून खाक झाली होती.

स्कूल बसला आग :

मदर्स ग्लोबल स्कूल बसला आग

मिळालेल्या माहितीनुसार, दिल्लीतील प्रीत विहार येथील मदर्स ग्लोबल स्कूलच्या वातानुकूलित बसमध्ये आग लागली. शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. मात्र, ही आग शॉर्टसर्किटमुळे लागली की त्यामागे अन्य काही कारण असावे, हा तपासाचा विषय आहे.


Show Full Article Share Now