कारगिल युद्धावेळी इतर देशांनी भारताला जुना शस्त्रसाठा पुरवला; तत्कालीन लष्करप्रमुख व्ही.पी. मलिक यांचा गौप्यस्फोट
General v p Malik (PC-Twitter)

तत्कालीन लष्करप्रमुख व्ही.पी. मलिक (General V P Malik) यांनी 1999 मध्ये झालेल्या कारगिल युद्धासंबंधी (Kargil War) काही महत्त्वाच्या घटनांचा खुलासा केला आहे. भारताला कारगिल युद्धावेळी मोठ्या प्रमाणात विदेशातून शस्त्रसाठा, दारुगोळा मागवावा लागला होता. त्यावेळी या देशांनी भारताला मदत करण्याऐवजी प्रचंड पैसा उकळला होता. तसेच 3 वर्ष जुने सॅटेलाइट फोटो भारताला दिले होते. असा गौप्यस्फोट मलिक यांनी 'मेक इन इंडिया'च्या (Make In India) कार्यक्रमात बोलताना केला आहे. असे वृत्त 'नवभारत टाइम्स' या हिंदी वृत्तपत्राने दिले आहे. (हेही वाचा - Kargil Vijay Diwas 2019: भारत-पाकिस्तान दरम्यान 1999 ला झालेल्या कारगिल युद्धाची 10 वैशिष्ट्यं)

भारताला कारगिल युद्धावेळी शस्त्रसाठा आणि दारुगोळ्याची गरज होती. त्यामुळे भारताने इतर देशाकडून शस्त्रासाठी आणि दारुगोळ्याची मागणी केली होती. परंतु, या देशांनी भारताला मदतीच्या नावाखाली जुन्या शस्त्रांचा पुरवठा केला. त्यावेळी या देशांनी भारताचे प्रचंड शोषण केलं. तसेच एका देशाकडून भारताने तोफा मागितल्या होत्या. परंतु, या देशाने सुरुवातीला तोफा देण्याचं आश्वासन दिलं. मात्र नंतर जुन्या तोफांची दुरुस्ती करून भारताला पाठविल्या, असंही मलिक यांनी सांगितलं. (हेही वाचा - निर्भया प्रकरण: फाशीच्या शिक्षेमुळे चारही आरोपी डिप्रेशनमध्ये; जेवण झालं कमी!)

भारताला त्यावेळी मदत केली गेली. परंतु, सॅटेलाइट फोटोसाठी भारताला प्रत्येकी 36 हजार रुपये द्यावे लागले होते. परंतु, एवढे पैसे देऊनही भारताला या देशांनी 3 वर्ष जुने सॅटेलाइट फोटो देण्यात आले होते, असा दावा मलिक यांनी केला आहे. 20 वर्षांपूर्वी कारगिलच्या पर्वतांवर भारत आणि पाकिस्तानदरम्यान कारगिल युद्ध झाले होते.