निर्भया प्रकरण: फाशीच्या शिक्षेमुळे चारही आरोपी डिप्रेशनमध्ये; जेवण झालं कमी!
Delhi Nirbhaya Gang Rape Case (PC- Twitter)

Nirbhaya Case: दिल्लीतील निर्भया प्रकरणातील चारही (Nirbhaya Case) आरोपींना लवकरच फाशी देण्यात येणार आहे. दिल्लीतील तिहार तुरूंगामध्ये याबाबत तयारीही सुरू झाली आहे. न्यूज 18 ने दिलेल्या वृत्तानुसार, या आरोपींना 16 डिसेंबर 2019 रोजी फाशी देण्याची शक्यता आहे. तिहार जेलमध्ये या 4 आरोपींना फाशी देण्यापूर्वी एका डमीला फाशी देण्यात आली. त्यामुळे आता या प्रकरणातील चारही आरोपी डिप्रेशनमध्ये असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. डिप्रेशनमुळे त्यांचे जेवण कमी झाल्याची माहिती तिहार जेलमधील सूत्रांनी दिली आहे. या प्रकरणातील आरोपी अक्षय, मुकेश, पवन गुप्ता आणि विनय शर्मा या चारही जणांच्या सुरक्षिततेसाठी 4 ते 5 कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. (हेही वाचा - Nirbhaya Gangrape Case: दोषींना फाशीची मागणी करणारी याचिका पटियाला हाऊस कोर्टात टळली; सुप्रिम कोर्टाच्या निर्णयानंतर होणार फैसला)

हैदराबादमध्ये डॉक्टर तरूणीवर बलात्कार करून हत्या करणार्‍या 4 आरोपींचा पोलिसांनी एन्कॉन्टर केला. त्यानंतर दिल्लीतील निर्भया बलात्कार प्रकरणातील आरोपींनाही फाशीची शिक्षा देण्याची मागणी जोर धरत आहे. दरम्यान, शुक्रवारी दिल्लीतील पटियाला हाऊस कोर्टमध्ये निर्भया गॅंगरेप प्रकरणातील आरोपींची सुनावणी टळली. फाशीची प्रक्रिया वेगवान करण्यासाठी याचिकेवर चारही दोषींना आणि त्यांच्या वकिलांना नोटीस देण्यात आली आहे. या चारही दोषींना शुक्रवारी न्यायाधीशांसमोर व्हिडिओ लिंकद्वारे हजर करण्यात आले होते. सुप्रीम कोर्टाचा निकाल येईपर्यंत सध्या 18 डिसेंबरपर्यंत या सुनावणीला स्थगिती देण्यात आली आहे. पटियाला हाऊस कोर्टने निर्भयाच्या आईकडून करण्यात आलेल्या फाशीच्या मागणीला फेटाळले आहे.

हेही वाचा - हैदराबाद येथे पुन्हा 18 वर्षीय तरुणीवर रिक्षाचालकाकडून मदतीच्या बहाण्याने बलात्कार

निर्भयाच्या आईने आरोपींना 16 डिसेंबरपूर्वी फाशीची शिक्षा व्हावी, अशी मागणी केली आहे. परंतु, न्यायालयाने या प्रकरणी 17 डिसेंबरला पुढची सुनावणी होणार आहे. त्यामुळे दोषींना फाशीची शिक्षा मिळणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.