Gangster Lawrence Bishnoi: भटिंडा मध्यवर्ती कारागृहात बंदिस्त गुंड लॉरेन्स बिश्नोईची (Lawrence Bishnoi) प्रकृती खालावली आहे. सोमवारी रात्री उशिरा त्यांना फरीदकोटच्या गुरु गोविंद सिंग वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले. मिळालेल्या माहितीनुसार, लॉरेन्स बिश्नोई यांचा ताप गेल्या काही दिवसांपासून उतरत नव्हता. त्यांची प्रकृती खालावल्याने तुरुंग प्रशासनाला त्यांना वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करावे लागले. रुग्णालयातील सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे.
लॉरेन्स बिश्नोईची टोळी दिल्ली, पंजाब, यूपी, झारखंड, हरियाणा, राजस्थानमध्ये सक्रिय आहे. लॉरेन्स बिश्नोई तुरुंगातून आपली टोळी चालवतो. याशिवाय अमेरिकेतील लॉरेन्स बिश्नोईचा भाऊ अनमोल बिश्नोई आणि अझरबैजानमधील लॉरेन्सचा पुतण्या सचिन बिश्नोई हे टोळी चालवत असून आंतरराष्ट्रीय गुन्हे सिंडिकेट चालवत आहेत. (हेही वाचा -Cyber Crime Police Arrested Kollywood Actor अभिनेता कानल कन्नन पोलीसांच्या ताब्यात, सोशल मीडियावर शेअर केला आक्षेपार्ह कंटेट)
एनआयएने अलीकडेच खुलासा केला होता की, लॉरेन्सने टॉप 10 टार्गेट केले असून त्यात सलमान खान पहिल्या क्रमांकावर आहे. या यादीत पंजाबी सिद्धू मुसेवालाच्या मॅनेजरचेही नाव आहे. दिल्ली तुरुंग प्रशासनाने गेल्या महिन्यात सांगितले होते की, कायदा आणि सुव्यवस्थेच्या दृष्टीने, गुंडाची कोठडी पूर्ण झाल्यानंतर त्याला शहरातील कोणत्याही तुरुंगात ठेवू नये. लॉरेन्सला दिल्लीच्या कोणत्याही तुरुंगात ठेवण्याऐवजी पंजाबच्या तुरुंगात ठेवावे.
टिल्लू ताजपुरिया यांच्या हत्येचा बदला घेण्यासाठी लॉरेन्स बिश्नोई आणि त्याच्या टोळीवर हल्ला केला जाऊ शकतो, अशी भीतीही तपास यंत्रणांनी व्यक्त केली आहे. दिल्ली तुरुंग प्रशासन याबाबत अगोदरच सतर्क असून कोणत्याही प्रकारचा धोका पत्करण्यास तयार नाही. लॉरेन्स बिश्नोई हा भटिंडा मध्यवर्ती कारागृहात अनेक दिवसांपासून बंद आहेत. येथून त्याला गुजरात पोलिसांनी एका गुन्हेगारी खटल्याच्या तपासासाठी ताब्यात घेतले असून गुजरातच्या साबरमती कारागृहात आणले. येथूनच दिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखेने लॉरेन्सला मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात एका प्रकरणात ताब्यात घेऊन दिल्लीला आणले.