Ganesh chaturthi 2019: पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याकडून गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा
राष्ट्रपति राम नाथ कोविंद और पीएम नरेंद्र मोदी ( फोटो क्रेडिट- PTI and pixabay)

गणेशोत्सव (Ganeshotsav 2019) संपूर्ण भारतात मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. गणेश मूर्ती स्थापित करुन भाविक १० दिवस त्या गणेश मूर्तीची पूजा करतात. गणेशोत्सवाच्या निमित्ताने प्रत्येकजण आपल्या कुटुंबाला, मित्राला आणि इतर लोकांना शुभेच्छा देत आहेत. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी(Naredra Modi), राष्ट्रपती रामनाथ कोविंद (Ramnath Kovind) यांनीही ट्विटरच्या माध्यमातून भारतीय नागरिकांना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

गणेशोत्सव हा सण महाराष्ट्रात (Maharashtra) अधिक साजरा केला जातो. गणेशाला बुद्धीचे प्रतिक मानले जाते. गणेशमूर्तीची स्थापना केल्यानंतर आपल्यावरील विघ्न टळतात, असा अनेकांचा समज आहे. आज सोमवारी गणेश मूर्तीची स्थापना करण्यात आली आहे. यामुळे प्रत्येकजण या दिवसाच्या शुभेच्छा देत आहे. नरेंद्र मोदी आणि रामनाथ कोविंद यांनीही भारतातील नागरिकांना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. राष्ट्रपती रामनाथ कोविंद हे ट्विटरच्या माध्यमातून म्हणाले की, "गणपती बाप्पा मोरया! गणेश उत्सवाच्या निमित्ताने भारतीय नागरिकांना शुभेच्छा. सर्वांना भरभरुन सुख आणि समृद्धी प्राप्त हो अशी ईश्वरचरणी प्राथना." तसेच पंतप्रधान म्हणाले की, "संपूर्ण भारतीय नागरिकांना गणेश चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा." हे देखील वाचा-Ganeshotsav 2019: अष्टविनायकामधील तिसरा गणपती 'सिद्धटेकचा सिद्धिविनायक'; जाणून घ्या मंदिर, मूर्ती आणि महत्व

ट्विट-

मुंबईतील (Mumbai) गणेश उत्सावाचे दर्शन घेण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रातून भाविक येत असतात. गणेशाची मूर्ती स्थापित झाल्यापासून १० दिवस मुंबईत गर्दीचा जमाव पाहायला मिळतो. मुंबईतील काही मंडळ त्यांच्या सजावटीच्या कामासाठी प्रसिद्ध आहेत. अशा मंडळाची कलाकृती बघण्यासाठी भाविक गर्दी करतात.