Stop Rape (Representative image)

मध्य प्रदेशची (Madhya Pradesh) राजधानी भोपाळमध्ये (Bhopal) धर्म लपवून अल्पवयीन मुलीशी मैत्री, बलात्कार (Rape) आणि अवैध गर्भपाताचे (Abortion) प्रकरण समोर आले आहे. या संदर्भात पीडितेचे जबाब नोंदवून पोलिसांनी आरोपी फैजल अब्बास याला अटक (Arrested) केली. त्याचवेळी आरोपीच्या सांगण्यावरून पोलिसांनी गर्भपात करणाऱ्या डॉक्टरांना अटक करून त्याचे क्लिनिक सील केले.  पोलिसांनी आरोपी आणि डॉक्टर विरुद्ध पॉक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. पोलिसांनी सांगितले की, आरोपी फैजल अब्बासने पीडितेसमोर आपली शान पंडित अशी ओळख उघड केली होती. यानंतर दोघांची मैत्री झाली.

त्यानंतर तिच्यावर अनेकवेळा बलात्कार तर केलाच, शिवाय तिला तीनदा गर्भवतीही केली. पीडितेने पोलिसांना दिलेल्या जबाबात सांगितले की, बलात्कारादरम्यान पहिल्यांदाच आरोपीने व्हिडिओही बनवला होता. त्यानंतर हा व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देऊन आरोपीने बलात्कार सुरूच ठेवला. पीडितेने सांगितले की, एकदा आरोपीने तिला डॉक्टरांकडे नेले आणि तिचा गर्भपात केला, तर त्यापूर्वी आरोपीने स्वत: दोनदा औषध आणून खायला दिले. हेही वाचा Go First Air च्या फ्लाईटमध्ये एअर होस्टेससोबत गैरवर्तन, प्रवाशाने शेजारी बसण्याची केली मागणी

आरोपींकडून वारंवार होणाऱ्या छळाला कंटाळून पीडितेने तिच्या कुटुंबीयांना या प्रकरणाची माहिती दिली. यानंतर 13 डिसेंबर रोजी अजक पोलिस ठाण्यात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी सांगितले की, प्रकरणाचे गांभीर्य पाहता पोलिसांनी 14 डिसेंबरलाच आरोपीला अटक केली. त्याचवेळी आरोपीच्या ओळखीवर गर्भपात करणाऱ्या डॉक्टरला अटक करण्यात आली आहे.

सध्या पोलीस आरोपी डॉक्टरची चौकशी करत असून त्याने आतापर्यंत किती प्रेग्नन्सी केल्या आहेत हे जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहेत. एसीपी निधी सक्सेना यांनी सांगितले की, आरोपी डॉक्टरला अटक केल्यानंतर बाग सेवानिया पोलिस स्टेशनपासून 100 मीटर अंतरावर असलेले त्याचे क्लिनिक सील करण्यात आले आहे.  आरोपी डॉ.मयांक श्रीवास्तव हा चिरायू चिकित्सालय या नावाने आपले क्लिनिक चालवत होता. पोलिसांनी आरोपीला शुक्रवारी न्यायालयात हजर केले, तेथून त्याची कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. हेही वाचा Mobile Blast: कॉलवर बोलत असताना मोबाईलचा स्फोट, तरुणाच्या हाताला दुखापत

पीडितेने चौकशीदरम्यान पोलिसांना सांगितले की, आरोपी फैजल अब्बास तिच्यावर धर्म बदलण्यासाठी सतत दबाव आणत होता. तो तिला बुरखा घालायला लावायचा.  पीडितेने सांगितले की, जेव्हा तिच्यावर पहिल्यांदा बलात्कार झाला तेव्हा ती फक्त 16 वर्षांची होती. पोलिसांनी आरोपीच्या ठिकाणी छापा टाकून त्याचे बनावट आधार कार्ड जप्त केले. या आधार कार्डावर त्याचे नाव शान पंडित असे लिहिले आहे.