Manipur Violence

मणिपूरच्या (Manipur Violance) विष्णुपूर जिल्ह्यात शुक्रवारी उशिरा झालेल्या हिंसाचाराच्या ताज्या घटनांमध्ये किमान तीन जणांचा मृत्यू झाला. मृत हे क्वाक्ता भागातील मेईतेई समुदायातील असल्याची माहिती आहे. हिंसाचाराच्या ताज्या घटनांमध्ये कुकी समाजाची अनेक घरेही जाळण्यात आली. विष्णुपूर (Bishnupur) पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मेईतेई समुदायातील तीन लोकांचा मृत्यू झाला आहे, तर कुकी समाजाच्या अनेक घरांना आग लावण्यात आली आहे.  पोलीस सूत्रांनी सांगितले की, काही लोक बफर झोन ओलांडून मेईतेई भागात आले आणि त्यांनी त्यांच्यावर गोळीबार केला. (हेही वाचा - Pune Airport: पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावर जप्त केले तब्बल दीड कोटीचे परकीय चलन,सीमा शुल्क विभागाने केली कारवाई)

विष्णुपूर जिल्ह्य़ातील क्वाकटा क्षेत्रापासून 2 किमी पुढे केंद्रीय सैन्याने संरक्षित केलेला बफर झोन बनवला आहे. विष्णुपूर जिल्ह्यात गुरुवारी सशस्त्र दल आणि मेईतेई समुदायाच्या आंदोलकांमध्ये झालेल्या संघर्षात 17 लोक जखमी झाल्याच्या दोन दिवसानंतर हे घडले आहे. या घटनेमुळे इम्फाळ पूर्व आणि इंफाळ पश्चिमच्या अधिकाऱ्यांनी पूर्वी जाहीर केलेली कर्फ्यूची शिथिलता मागे घेतली आहे.

सशस्त्र दल आणि मणिपूर पोलिसांनी जिल्ह्यातील कांगवई आणि फुगाकचाओ भागात आंदोलकांना पांगवण्यासाठी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या. मिळालेल्या माहितीनुसार, मेईती महिला जिल्ह्यातील बॅरिकेडेड झोन ओलांडण्याचा प्रयत्न करत असताना ही घटना घडली. त्यांना आसाम रायफल्स आणि रॅपिड अॅक्शन फोर्स (RAF) यांनी रोखले, त्यामुळे दगडफेक आणि समुदाय आणि सशस्त्र दलांमध्ये संघर्ष झाला.

मणिपूर हिंसाचार

सुमारे तीन महिन्यांपूर्वी ईशान्येकडील राज्यात जातीय हिंसाचार सुरू झाला, तेव्हापासून 160 हून अधिक लोक मारले गेले आणि शेकडो जखमी झाले. मेईटी समुदायाच्या अनुसूचित जमाती (एसटी) दर्जाच्या मागणीला विरोध करण्यासाठी पहाडी जिल्ह्यांमध्ये 3 मे रोजी 'आदिवासी एकता मार्च' आयोजित केल्यानंतर हिंसाचाराचा भडका उडाला.

मणिपूरच्या लोकसंख्येच्या सुमारे 53 टक्के मेईटीस आहेत आणि ते मुख्यतः इम्फाळ खोऱ्यात राहतात, तर आदिवासी, ज्यात नागा आणि कुकी यांचा समावेश आहे, 40 टक्के आहेत आणि ते प्रामुख्याने डोंगराळ जिल्ह्यांमध्ये राहतात.