Pune Airport: पुण्यातील लोहगाव येथील आंतरराष्ट्रीय विमानतळावर (International Airport) कस्टम विभागाने (सीमा शुल्क विभागाने) मोठी कारवाई केली आहे. या घटनेसंदर्भात चौघांवर कारवाई करण्यात येईल अशी माहिती मिळाली आहे. या चौघांवर तब्बल दीड कोटी रुपयांचे परकीय चलन जप्त करण्यात आले आहे. शुक्रवारी संध्याकाळी दीड कोटी परकीय चलन जप्त केले आहे. पोलीसांकडून या संदर्भात चौकशी करण्यात आली आहे. मोबाईल सह परकीय चलन जप्त करण्यात आले आहे.
कस्टमच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार चार प्रवासांवर संशय आल्यामुळे चौकशी केली त्यांनी त्यातील एकाला ताब्यात घेतले. त्याची झडती घेतली असता त्याच्या बॅगमध्ये तब्बल 9लाख 22 हजार रुपयांचे दिरहम आढळले. पोलिसांनी ते जप्त केले. त्यानंतर कस्टमच्या पथकाने आणखी एक कारवाई केली. या कारवाईत तिघांना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडून एक कोटी 41 लाख 11 हजार 728 रुपये किंमतीचे दिरहम जप्त करण्यात आले. चौघा प्रवाशांनी मर्यादेपेक्षा जास्त परकीय चलन बाळगल्याने त्यांच्याविरुद्ध कारवाई करण्यात आली आहे. याप्रकरणाचा कस्टमकडून तपास करण्यात येत आहे.
intercepted carrying Foreign Currency AED - 651805 having Tariff Value Rs. 1,41,11,578 on 31.07.2023. The currencies being above permissible limits were seized. Further investigation is in progress.
— Pune Customs (@PuneCustoms) August 4, 2023