प्रातिनिधिक प्रतिमा (Photo Credit : Youtube)

सध्या ज्यांच्याकडे कार अथवा इतर चारचाकी गाड्या आहेत, त्यांची पेट्रोलनंतर सर्वात मोठी समस्या असते ती टोल (Toll). सध्या टोलच्या किंमती इतक्या वाढल्या आहेत, की दूरच्या प्रवासाला वार घेऊन जाणे अवघड ठरते. तर टोलपासून आणि पार्किंगपासून वाचण्यासाठी सरकारने एक भन्नाट आयडिया शोधली आहे. इलेक्ट्रीक वाहनांसाठी (Electric Cars) सरकारने पूर्णतः टोलमाफी केली आहे. तसेच अशा गाड्यांना कोणतेही पार्किंग शुल्कही भरावे लागणार नाही. देशातील प्रदूषण कमी करण्याऱ्या इलेक्ट्रिक गाड्या खरेदीला वाव मिळावा म्हणून सरकारने हे पाऊल उचलले आहे.

देशात इकेक्ट्रिक गाड्यांची चांगलीच क्रेझ आहे, मात्र चार्जिंग स्टेशनची (Charging Station) योग्यती सोय न झाल्याने नागरिक इलेक्ट्रीक वाहन खरेदी करताना धजावत नाहीत. यावर सरकारकडून लवकरच काही उपाययोजना करण्यात येणार आहे. असे चार्जिंग स्टेशन प्रति 25 किलोमीटर अंतरावर स्थापन करण्याचा सरकारचा मानस आहे. त्याआधी सरकारकडून इलेक्ट्रिक गाड्यांना टोल माफी आणि मोफत पार्किंगची सोय देण्यात आली आहे. याबाबतचे आदेशही केंद्रसरकाने राज्य सरकरांना दिले आहेत. लवकरच याबाबतचे नियम लागू करण्यात येतील.

(हेही वाचा: पेट्रोल पंप घेणार निरोप; वाहन खरेदी करताना घ्या काळजी; इलेक्ट्रिक कार काळाची गरज)

इंधनाचे वाढते दर आणि त्यामुळे पर्यावरणाची होणारी हानी लक्षात घेऊन भारतात ई-कारचा वापर वाढावा यासाठी सरकार विविध योजना सुरु करत आहे. अशा वाहनांसाठी नव्या नंबर प्लेट्सदेखील देण्यात आल्या आहेत. या वाहनांची नंबरप्लेट हिरव्या रंगात असणार आहेत, यावर नंबर पांढऱ्या रंगात लिहिला जाणार आहे. सरकारच्या योजनांचा लाभ घेण्यासाठी या इलेक्ट्रिक गाड्या ओळखू याव्यात म्हणून या प्लेट्स वेगळ्या रंगात असणार आहेत.