
महाराष्ट्रातील (Maharashtra) एका कंपनीला डेटा एन्ट्रीचे काम करून देण्याच्या आश्वासनावर 1.27 कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी एका भावाला आणि त्याच्या बहिणीला अटक ( arrested) करण्यात आली आहे. सध्या फसवणूकीच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. यामध्ये ऑनलाईन फसवणूकीचे (Online fraud) गुन्हे वाढले आहेत. आरोपी भोजीपुरा (Bhojipura) भागातील पडरी खालसा (Padri Khalsa) येथील रहिवासी आहेत. अनिल कुमार गंगवार आणि त्याची बहीण प्रीती गंगवार यांना गुरुवारी अटक करण्यात आली आहे. यांना महाराष्ट्र पोलिसांनी (Maharashtra Police) ताब्यात घेतले आहे. त्यांनी महाराष्ट्रात बनावट कंपनी चालविली. राज्यातल्या दुसर्या कंपनीची फसवणूक केल्याची घटना समोर आली आहे.
वरिष्ठ पोलिस अधीक्षक (Senior Superintendent of Police) रोहितसिंग सजवान यांनी सांगितले की, त्यांच्या विरोधात महाराष्ट्रातील बुलढाणा जिल्ह्यातील महाईकर पोलिस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. त्यांच्या ताब्यातून अनेक डेबिट व क्रेडिट कार्ड जप्त करण्यात आल्याची माहिती एसएसपीने दिली. ते म्हणाले की, या दोघांविरूद्ध तेलंगणामध्ये लोकांची फसवणूक केल्याच्या आरोपाखालीही गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या फसवणूकीतील आरोपींना महाराष्ट्र पोलिसांनी अटक केली आहे. अशा घटना वारंवार घडत असल्याने सामान्यांनी सतर्क राहणे गरजेचे आहे. त्याबरोबरच पोलिसांनी अशा घटनेचा तपास लवकरात लवकर करणे देखील महत्वाचे आहे. अशा गुन्ह्यातील आरोपींना योग्य ती शिक्षा देण्यात यावी. उत्तर प्रदेशमध्ये अशा घटना वाढण्याचे प्रमाण वारंवार वाढत आहे. याआधीही अशा अनेक घटना समोर आल्या आहेत. त्यातील काही घटनांचा शोध लावण्यात पोलिसांना यश आलं आहे. तर काही घटनांचा अजून शोध सुरु आहे.