Dog Attack in Karnataka: गेल्या काही दिवसांपासून भटक्या कुत्र्यांच्या हल्लेत वाढ झाली आहे. त्यामुळे नागरिक एकीकडे संताप व्यक्त करत आहे. या हल्ल्यात आता पर्यंत कितीतरी जणांचा मृत्यू झाला आहे. त्यात कर्नाटकातील रायचूर जिल्ह्यात एका ४ वर्षाच्या मुलीवर कुत्र्याने हल्ला केला होता. या हल्ल्यात मुलीचा मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर परिसरात एकाच खळबळ उडाली आहे. कुत्र्याच्या हल्ल्यात मुलगी गंभीर जखमी झाली होती. गंभीर जखमेत मुलगी गेल्या पंधरा दिवस आयुष्यांची झुंज देत होती. (हेही वाचा- एका कोंबड्याने घेतला तीन जणांचा जीव; दोन सख्ख्या भावांसह शेजाऱ्याचा मृत्यू,
मिळालेल्या माहितीनुसार, लावण्या असं कुत्र्याच्या हल्ल्यात मृत्यू झालेल्या मुलीचे नाव आहे. पंधरा दिवसांपूर्वी लावण्या मित्रांसोबत घरासमोर खेळत होती. अचानक एका भटक्या कुत्र्यांनी मुलांवर हल्ला केला. या हल्ल्यात कुत्र्यांने लावण्याच्या मानेवर चावा घेतला. यात ती गंभीर जखमी झाली. गंभीर अवस्थेत तीच्या वडिलांनी तीला रुग्णालयात दाखल केले. पंधरा दिवसांपासून ती आयुष्यांशी झुंज होती. अखेर सोमवारी लावण्याचा मृत्यू झाला.
या घटनेनंतर परिसरातील नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. असे भविष्यात पुन्हा घडू नये या करिता प्रशासनाकडून कारवाईची मागणी केली आहे. ग्रामपंचायत विकास अधिकारी यांनी गावाला भेट दिली. लोकांवर हल्ला करणाऱ्या भटक्या कुत्र्यांचा शोध घेतला जाईल अशी माहिती गावकऱ्यांना दिली.