Gujarat Virus Infection: गुजरातमधील साबरकांठा जिल्ह्यात चंडीपुरा विषाणूच्या संशयास्पद संसर्गामुळे चार मुलांचा मृत्यू झाला आहे आणि इतर दोन जणांना सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. शनिवारी या संदर्भात माहिती देण्यात आली. प्रशासनाने संसर्गाचा प्रचार रोखण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत. 10 जुलै ही चार मुलांचा मृत्यू सिव्हिल रुग्णालयात झाला. मृतांपैकी एक साबरकांठा येथील, दोन जण अरवली जिल्ह्यात आणि एक राजस्थानचा आहे. रुग्णालयात उपचार घेत असलेली दोन मुले राजस्थान येथील आहे. (हेही वाचा- कूलरजवळ बसण्यावरून वाद, भरमंडपात लग्न करण्यास वधूने दिला नकार; नवरदेवाचा व्हिडिओ व्हायरल)
मिळालेल्या माहितीनुसार, राजस्थानच्या अधिकाऱ्यांना संशयास्पद विषाणू संसर्गामुळे मृत्यू झाल्याची माहिती देण्यात आली आहे. चंडीपुरा विषाणू, Rhabdoviridae कुटुंबातील सदस्य, फ्लू सारखी लक्षणे कारणीभूत आहे. तीव्र एन्सेफलायटीस आणि मेंदूची जळजळ उभ्दवते. हा आजार महाराष्ट्रात प्रथम 1965 मध्ये ओळखला गेला आणि देशातील एन्सेफलायटीस रोगाच्या विविध उद्रेकाशी त्याचा संबंध आहे.
हा विषाणू डास, टिक्स आणि सॅंडफ्लाय यांसारख्या वाहकांद्वारे प्रसारित केला जातो आणि त्यामुळे आजारपण, कोमा आणि मृत्यूचा धोका निर्माण होतो. 2003 मध्ये आंध्र प्रदेश आणि महाराष्ट्रात मोठा उद्रेक झाला होता. त्यामुळे 329 बाधित मुलांपैकी 183 मुलांचा मृत्यू झाला. गुजरात राज्यात 2004 मध्ये तुरळक प्रकरणे आणि मृत्यूही झाले.
साबरकांठा मुख्य जिल्हा आरोग्य अधिकारी राज सुतारिया यांनी सांगितले की, सहा बाधित मुलांचे रक्त नमुने पुष्टीकरणासाठी पुण्यातील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉडी (NIV) येथे पाठवण्यात आले आहे. एका अधिकाऱ्याने सांगितले की, 10 जुलै रोजी चार मुलांचा मृत्यू झाल्यानंतर हिम्मतनगर सिव्हिल हॉस्पिटलमधील बालरोगतज्ञांना चांदीपुरा विषाणूचा संशय आला होता. सध्या रुग्णालयात दाखल असलेल्या इतर दोन मुलांमध्येही अशीच लक्षणे दिसत आहेत. या विषाणूचा संसर्ग होण्याची शक्यता दर्शवते.