Assam Flood: आसाममध्ये पुराने संपूर्ण जीवन विस्कळित झाले आहे. जमुनामुख जिल्ह्यातील दोन गावांतील 500 हून अधिक कुटुंबांना रेल्वे रुळांवर राहावे लागले आहे. या लोकांना रेल्वे ट्रॅकचा सहारा घ्यावा लागला. शुक्रवारी पूरस्थितीत किंचित सुधारणा दिसून आली. परंतु नागाव, होजई, कचार आणि दररंग जिल्ह्यांतील परिस्थिती अजूनही गंभीर आहे. आसाम राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या अहवालानुसार राज्यातील 29 जिल्ह्यांमध्ये सुमारे 7.12 लाख लोक पुराच्या विळख्यात आहेत.
नागाव जिल्ह्यात 3.36 लाखांहून अधिक लोक बाधित झाले आहेत, तर कचर जिल्ह्यात 1.66 लाख, होजईमध्ये 1.11 लाख आणि दररंग जिल्ह्यात 52,709 लोक प्रभावित झाले आहेत. पाटिया पाथर गावातील रहिवाशांनी पुरामध्ये जवळजवळ सर्व काही गमावले आहे आणि त्यांना जवळच्या तात्पुरत्या शेडखाली राहण्यास भाग पाडले आहे. जिल्हा प्रशासन, राज्य सरकार किंवा केंद्र सरकारकडून फारशी मदत मिळाली नसल्याचा दावा ग्रामस्थांनी केला आहे. (हेही वाचा - Rajnath Singh Statement: महामारीच्या काळात पंतप्रधानांनी अर्थव्यवस्थेला तळ गाठण्यापासून वाचवले, केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचे वक्तव्य)
पाऊस आणि पुरामुळे आसाममधील परिस्थिती चिंताजनक आहे. संततधार पावसामुळे 29 जिल्ह्यांतील 2585 गावांतील 8 लाखांहून अधिक लोक बाधित झाले आहेत. पावसामुळे झालेल्या भूस्खलनामुळे आतापर्यंत 14 जणांचा मृत्यू झाला आहे. तात्पुरत्या शेडमध्ये राहणारे लोक अमानवी परिस्थितीत जगत आहेत.
The aftermath of incessant rainfall and flood at Haflong in Dima Hasao district of Assam. pic.twitter.com/4nVBfB4CQk
— ANI (@ANI) May 21, 2022
अनेक भागात भूस्खलन -
आसाममध्ये मुसळधार पावसामुळे अनेक भागात भूस्खलनही झाले आहे. न्यू कुंजांग, फ्यांगपुई, मौलहोई, नामजुरंग, दक्षिण बागेतर, महादेव टिला, कालीबारी, उत्तर बागेतर, जिओन आणि लोदी पांगमौल या गावांमध्ये भूस्खलन झाल्याची माहिती मिळाली आहे. दरड कोसळल्याने जटिंगा-हरणगाव आणि माहूर-फिडिंग येथील रेल्वे मार्ग ठप्प झाला आहे.