Chhattisgarh Raipur Hospital Fire: रायपूरमधील रुग्णालयात भीषण आग; ऑक्सिजन पुरवठा बंद झाल्याने 5 रुग्णांचा मृत्यू, मृतांमध्ये कोरोना रुग्णांचाही समावेश
Chhattisgarh Raipur Hospital Fire (PC - ANI)

Chhattisgarh Raipur Hospital Fire: रायपूरच्या पचपेडी नाकाजवळील राजधानी रुग्णालयात आग लागल्याची घटना समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या अपघातात 5 जणांचा मृत्यू झाला आहे. या रूग्णालयात कोरोनाचे रुग्णदेखील उपचार घेत होते. राजधानी रुग्णालयात जवळपास 50 रूग्णांवर उपचार सुरू होते. आयसीयूमधील शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचं म्हटलं जात आहे.

या घटनेनंतर रुग्णांना दुसर्‍या रुग्णालयात हलविण्यात आले आहे. आगीत मृत्यू झालेल्या 5 मृतांपैकी एकाचा मृत्यू आगीत भाजल्याने झाला असून 4 जणांचा मृत्यू ऑक्सिजन पुरवठा बंद पडल्याने झाला. या घटनेची माहिती मिळताचं पोलिस प्रशासन आणि अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेतली आणि मदत आणि बचावकार्य केले. (वाचा - Asangaon Fire: ठाण्यातील आसनगाव मध्ये प्लॅस्टिक फॅक्टरीला भीषण आग; 12 फायर इंजिन घटनास्थळी दाखल)

दरम्यान, कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर अनेक ठिकाणी आगीच्या घटना उघडकीस आल्या आहेत. रुग्णालय आणि आरोग्य सेवा असलेल्या ठिकाणी आग लागल्यामुळे अडचणी वाढत आहेत. अलीकडेचं मुंबईतील रुग्णालयात लागलेल्या आगीत 10 जणांचा मृत्यू झाला होता. ही आग मुंबईतील मॉलमध्ये लागली होती. ज्या मॉलमध्ये आग लागली होती तेथील एका मजल्यावर एक रुग्णालय चालवले जात होते.

याशिवाय नुकतीचं नागपुरातील वाडी भागातील वेल ट्रीटमेंट कोविड हॉस्पिटलच्या आयसीयूमध्ये भीषण आग लागल्याची घटना समोर आली होती. या घटनेत 3 जणांचा मृत्यू झाला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही या अपघाताबद्दल शोक व्यक्त केला होता.