Union Budget 2024: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Union Finance Minister Nirmala Sitharaman) आपला सलग सातवा केंद्रीय अर्थसंकल्प (Union Budget 2024) सादर करण्याच्या तयारीत आहेत. संसदेचे पावसाळी अधिवेशन (Monsoon Session of Parliament) 22 जुलैपासून सुरू होणार आहे. या दिवशी अर्थमंत्री संसदेत आर्थिक सर्वेक्षण मांडतील आणि दुसऱ्या दिवशी त्या मोदी 3.0 सरकारचा पहिला अर्थसंकल्प (Union Budget) सादर करतील. मागील काही पूर्ण केंद्रीय अर्थसंकल्पांप्रमाणे, 2024 चा अर्थसंकल्प देखील पेपरलेस स्वरूपात (Budget In Paperless Format) सादर केला जाईल. 2021 मध्ये पेपरलेस बजेट सादर करण्यास सुरुवात झाली. त्यावेळी कोरोना महामारी शिगेला पोहोचली होती. अशा परिस्थितीत कागदपत्रांच्या माध्यमातून कोरोनाचा संसर्ग पसरण्याची भीती व्यक्त केली जात होती. त्यामुळे सरकारने पेपरलेस बजेट सादर करण्याचा निर्णय घेतला होता.
हिंदी आणि इंग्रजीमध्ये उपलब्ध असणार बजेट -
केंद्रीय अर्थसंकल्पाशी संबंधित सर्व कागदपत्रे 'Union Budget Mobile App' वर उपलब्ध असतील. यामुळे संसद सदस्य आणि सर्वसामान्यांना बजेटची कागदपत्रे कोणत्याही अडचणीशिवाय मिळतील. हे ॲप द्विभाषिक (इंग्रजी आणि हिंदी) आहे. हे Android आणि iOS दोन्ही प्लॅटफॉर्मवर डाउनलोड केले जाऊ शकते. तुम्ही केंद्रीय बजेट वेब पोर्टल (www.indiabudget.gov.in) वरून देखील ॲप डाउनलोड करू शकता. (हेही वाचा - Union Budget 2024: केंद्रीय अर्थसंकल्प सादर करण्यापूर्वी Nirmala Sitharaman यांनी आज घेतला 'Halwa Ceremony' मध्ये सहभाग (Watch Video))
हे ॲप नॅशनल इन्फॉर्मेटिक्स सेंटरने (NIC) विकसित केले आहे. वित्त मंत्रालयाच्या अंतर्गत आर्थिक व्यवहार विभाग (DEA) द्वारे त्याचे निरीक्षण केले जाते. बजेट सादर झाल्यानंतर लगेचच सर्व कागदपत्रे या ॲपवर उपलब्ध होतील. (हेही वाचा - Union Budget 2024 Date: मोठी बातमी! मोदी 3.0 सरकारचा पहिला केंद्रीय अर्थसंकल्प 23 जुलै रोजी सादर होणार, अर्थमंत्री निर्मला सीतारामन सातव्यांदा सादर करणार बजेट)
दरम्यान, निर्मला सीतारामन यांच्या नावावर सलग सात अर्थसंकल्प सादर करण्याचा विक्रम नोंदवला जाणार आहे. आतापर्यंत हा विक्रम मोरारजी देसाईंच्या नावावर आहे. देसाई 1959 ते 1964 या काळात देशाचे अर्थमंत्री होते. त्यांनी देशासाठी विक्रमी सहा अर्थसंकल्प सादर केले. त्यापैकी पाच पूर्ण अर्थसंकल्प आणि एक अंतरिम अर्थसंकल्प होता.