अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Photo Credit: PTI)

Union Budget 2024 Date: एनडीए सरकारच्या स्थापनेनंतर, लोक 2024-25 या आर्थिक वर्षाच्या पहिल्या पूर्ण केंद्रीय अर्थसंकल्पाची (Union Budget 2024) वाट पाहत होते. आता ही प्रतीक्षा संपली असून अर्थसंकल्प सादर होण्याची तारीख आली आहे. 23 जुलै रोजी लोकसभेत अर्थसंकल्प सादर होणार आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू (President Draupadi Murmu) यांनी भारत सरकारच्या शिफारशीनुसार 22 जुलै ते 12 ऑगस्ट या कालावधीत अर्थसंकल्पीय अधिवेशन, 2024 साठी संसदेच्या दोन्ही सभागृहांची बैठक बोलावण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. (हेही वाचा - Union Budget 2024-25: अर्थमंत्री यंदा सादर करणार Interim Budget; जाणून घ्या अंतरिम बजेट आणि नियमित बजेट मध्ये काय असतो फरक?)

संसदेचे पावसाळी अधिवेशन 22 जुलैपासून सुरू होत आहे. अशा स्थितीत अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी आर्थिक सर्वेक्षण तर दुसऱ्या दिवशी अर्थसंकल्प मांडला जाणार आहे. अनेक दिवसांपासून याचा अंदाज लावला जात होता, मात्र आता याला पुष्टीही मिळाली आहे. (हेही वाचा - Union Budget 2024: केंद्रीय अर्थसंकल्प सादर होण्यापूर्वी केली जाणारी 'Halwa Ceremony' काय असते?)

किरेन रिजिजू यांचे ट्विट - 

मोदी सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळातील पहिला अर्थसंकल्प -

मोदी सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळातील हा पहिला पूर्णवेळ अर्थसंकल्प आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन सातव्यांदा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. याआधी अर्थमंत्री म्हणून त्यांनी 5 पूर्ण आणि एक अंतरिम अर्थसंकल्प सादर केला होता. FY2024-25 चा अंतरिम अर्थसंकल्प 1 फेब्रुवारी 2024 रोजी सादर करण्यात आला. मोदी 3.0 च्या या अर्थसंकल्पाकडून लोकांना खूप अपेक्षा आहेत. या अर्थसंकल्पात सर्वसामान्यांसाठी टॅक्सबाबत मोठी घोषणा होऊ शकते, असे मानले जात आहे.