Union Budget 2024: केंद्रीय अर्थसंकल्प सादर होण्यापूर्वी केली जाणारी 'Halwa Ceremony' काय असते?
Halwa Ceremony 2023 File Photo | PC: Twitter

भारताचा अर्थसंकल्प (Union Budget) 1 फेब्रुवारी दिवशी सादर केला जातो. भारतामध्ये आगामी लोकसभा निवडणूकांपूर्वी मोदी सरकारचे हे शेवटचे बजेट आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना या बजेट कडून मोठ्या अपेक्षा आहेत. भारतात बजेट पूर्वी देखील हलवा सेरेमनी (Halwa Ceremony) पार पडते. या कार्यक्रम नेमका काय असतो? यंदा कधी आहे? आणि बजेटशी त्याचा काय संबंध असा प्रश्न तुमच्या मनात येत असेल तर जाणून घ्या या प्रश्नांची उत्तरं! नक्की वाचा: Fourth Largest Stock Market: Hong Kong ला मागे टाकत भारताचं स्टॉक मार्केट जगातील चौथ्या क्रमाकांचं स्टॉक मार्केट - Bloomberg रिपोर्ट .

हलवा समारंभ काय असतो? 

केंद्रीय अर्थसंकल्पाच्या छपाईचं काम सुरू झालं की बजेटच्या अंतिम टप्प्याचे संकेत ही हलवा सेरेमनी देत असते. अर्थसंकल्प बनवणं आणि त्याची छपाई करणं ही मोठी जटील प्रक्रिया असते. यामध्ये वरिष्ठ अधिकार्‍यांचा समावेश असते. बजेट सादर होण्यापूर्वी काही दिवस आधी हा हलवा सेरेमनी केला जातो.

हलवा सेरेमनी मध्येच याचा संकेत आहे. अर्थमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये हलवा बनवला जातो आणि तो सार्‍या कर्मचार्‍यांना वाटला जातो. दिल्लीमध्ये नॉर्थ ब्लॉक च्या अर्थमंत्रालयाच्या कार्यालयामध्येच हा कार्यक्रम आयोजित केला जातो. भारतीय संस्कृतीत, एखाद्या चांगल्या विशेष प्रसंगाचे स्मरण ठेवण्यासाठी काहीतरी गोड खाण्याची प्रथा आहे. ही परंपरा, अर्थ मंत्रालय केंद्रीय अर्थसंकल्प सादर होण्यापूर्वी “हलवा समारंभ” साजरा म्हणून साजरा करते. केंद्रीय अर्थसंकल्प तयार करताना सर्व सदस्यांनी घेतलेल्या प्रयत्नांची दखल घेण्याचा यामागील उद्देश आहे.

हलवा समारंभामागील उद्देश

केंद्रीय अर्थसंकल्प तयार करताना, सर्व सदस्य अर्थ मंत्रालयाच्या आवारात स्वतःला “लॉक-इन”करून घेतात. अंतिम अर्थसंकल्पीय दस्तऐवजाची गोपनीयता जपण्यासाठी कर्मचार्‍यांना स्वतःच्या कुटुंबापासूनही दूर केले जाते. 1 फेब्रुवारीला संसदेत केंद्रीय अर्थसंकल्प सादर होईपर्यंत जवळपास 8-10 दिवस या कर्मचाऱ्यांना नॉर्थ ब्लॉकमध्ये राहावे लागते.

यंदा हलवा समारंभ कधी?

यंदाच्या हलवा समारंभाची तारीख अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही. 1 फेब्रुवारीपूर्वी तो केला जातो. आता बजेटही डिजिटल स्वरूपात मांडलं जात असल्याने छापलेल्या पेपर ऐवजी टॅब वर वाचलं जातं.

केंद्रीय अर्थमंत्री Nirmala Sitharaman यंदा 1 फेब्रुवारीला अंतरिम बजेट सादर करणार आहेत. पूर्ण अर्थसंकल्प नवं सरकार स्थापन झाल्यानंतर 2024-25 मध्ये जुलै महिन्यात सादर केलं जाईल.