हत्तीच्या पिल्लूने वाढदिवसाच्या दिवशी कापला 50 किलोग्रॅमचा केक
फोटो सौजन्य - गुगल

लोक वाढदिवसाचा उत्साह द्विगुणीत करण्यासाठी आपल्या नातेवाईक, मित्र- मंडळीसोबत केक कापतात. मात्र बिहार येथील समस्तिपुर येथे काही पशुप्रेमींनी चक्क माणसाचा नाही तर हत्तीच्या पिल्लूचा केक कापून वाढदिवस साजरा केला आहे. तर या पिल्लूने आपल्या सोंडेने तलवार पकडून 50 किलोग्रॅमचा केक कापला आहे.

बिहार विधानसभेचे अध्यक्ष विजय कुमार चौधरी आणि मथुरापुरचे महेंद्र प्रधान यांची पशूप्रेमी म्हणून बिहारमध्ये ओळख आहे. तसेच हत्तीच्या पिल्लूचे त्यांनी 'रानी' हे नाव सुद्धा ठेवले आहे. 2011 रोजी 'माला' नावाची एक मादी हत्ती त्यांना भेट स्वरुपात देण्यात आली होती. त्यावेळेस माला ही गर्भवती अवस्थेत होती. त्यानंतर तिने काही महिन्यानंतर एका मादी हत्तीला जन्म दिला आणि तिचे 'रानी' हे नाव ठेवण्यात आले. त्यामुळे यंदा 2018 मध्ये रानीला आठ वर्ष पूर्ण झाल्याच्या आनंदात बिहारमध्ये तिच्या वाढदिवसाच्या निमित्ताने केक कापण्यात आला.

या वाढदिवसाच्या आयोजनच्या वेळी उपस्थित असलेल्या बिहारच्या नागरिकांनी रानीसाठी भेट वस्तू आणि खूप शुभेच्छांचा वर्षाव केला. तसेच महेंद्र प्रधान यांचे पशूप्रेम हे समाजासाठी उत्तम उदाहरण असल्याचे सांगितले जात आहे.