Assam: ड्रग्ज घेण्यासाठी जन्मदात्या पित्याने पोटच्या मुलाला विकले
प्रतिकात्मक फोटो (Photo Credits-PTI)

Father sells toddler For to Buy Drugs: ड्रग्ज घेण्यासाठी जन्मदात्या पित्यानेच पोटच्या अडीच वर्षाच्या मुलाला विकल्याची घटना उघडकीस आली आहे. आसामच्या (Assam) गुवाहाटीपासून (Guwahati) 80 किलोमीटर दूर असलेल्या मोरीगावच्या (Morigaon) लहारीघाट (Laharighat) परिसरात हा धक्कादायक घडला आहे. याप्रकरणी आरोपीच्या पत्नीने पोलिसांत तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्र वेगाने फिरवत मुलाच्या बापाला आणि त्याल्या विकत घेणाऱ्या महिलेला बेड्या ठोकल्या आहेत. या घटनेनंतर संपूर्ण परिसरात एकच खळबळ माजली आहे. याप्रकरणी स्थानिक पोलीस पुढील तपास करीत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, अमीनुल इस्लाम असे आरोपीचे नाव आहे. इस्लाम ड्रग्ज तस्करी करीत असल्याने त्याची पत्नी रुकमिणा बेगम त्याला सोडून माहेरी राहत होती. त्यांना एक अडीज वर्षाचा मुलगा आहे. परंतु,  इस्लाम काही दिवसांपूर्वी सासरी गेला. तसेच आपल्या मुलाचे आधारकार्ड बनवायचे सांगून त्याला सोबत घेऊन आला. मात्र, तीन-चार दिवस उलटून गेल्यानंतरही इस्लाम घरी परतलाच नाही. यानंतर रुकमिणाने चौकशी केली. त्यावेळी इस्लामने पैशांसाठी आपल्या मुलाला विकल्याची धक्कादायक माहिती समोर आली. त्यानंतर रुकमिणाने 5 ऑगस्ट रोजी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. हे देखील वाचा- Madhya Pradesh Crime: भोपाळमध्ये दुचाकी उचलल्याच्या रागात तरुणाने वाहतुक पोलिसावर केला हल्ला, आरोपीवर गुन्हा केला दाखल

त्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्र वेगाने फिरवत इस्लामला ताब्यात घेतले. त्यानंतर त्याची चौकशी केली असता, त्याने मोरीगावच्या लहरीघाट गावात राहणाऱ्या साजिदा बेगमला मुलाला विकल्याची कबूली दिली. धक्कादायक बाब म्हणजे, ड्रग्ज खरेदी करण्यासाठी त्याने मुलाला 40 हजारांना विकल्याचे कारण समोर आले आहे. पोलिसांनी मुलाला साजिदाच्या ताब्यातून सोडवून त्याच्या आईकडे सोपवले आहे. तसेच सा्जिदालाही पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. महत्वाचे म्हणजे, इस्लाम ड्रग्स घेणे आणि विकण्यासोबत सेक्स रॅकेट चालवत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.