Indore Accident: मुलींच्या लग्नाची पत्रिका वाटताना वडिलांचा अपघाती मृत्यू, कुटुंबावर दुखाचा डोंगर,  इंदौर येथील घटना
Accident | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

Indore Accident: घरात लग्नाची जोरदार तयारी सुरु असलेल्या कुटुंबिवार अचानक दुखाचा डोंगर कोसळला आहे. ही घटना इंदौरमध्ये घडली आहे. दोन मुलीच्या लग्नाची पत्रिका वाटण्यासाठी गेलेल्या वडिलांचा अपघातात मृत्यू झाला. शनिवारी सांयकाळी घडलेल्या या घटनेमुळे गावात शोक पसरला आहे. दुचाकी घसरून त्यांच्या अंगावर ट्रक आदळला आणि भीषण अपघात झाला. (हेही वाचा- अमानुष मारहाणीत संशयित आरोपीचा मृत्यू, अकोला येथील पोलिस निलंबित)

मिळालेल्या माहितीनुसार, मन्ना सिंगर (43) असं मृताचे नाव आहे. ते नयापूरा, धार येथील रहिवासी आहे. फिनिक्स मॉलजवळ दुपारी 4 वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला आहे. घरी जात असताना रस्त्यावरून त्यांची दुचाकी घसरली. दुचाकी घरसल्याने ते पुढे जाऊन बाईकसोबत पडले. परंतु  समोरच्या दिशेने भरधाव ट्रक आला आणि त्यांच्या अंगावरून गेला. यात ते गंभीर जखमी झाले. रस्त्यावर असलेल्या लोकांनी त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल केले. परंतु डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

मन्ना सिन्नर यांच्या दोन मुलींचे येत्या 20 आणि 21 एप्रिल रोजी लग्न होतं. त्याकरिता ते नातेवाईकांना लग्न पत्रिका वाटण्यासाठी जात होते. घरी परतत असताना फिनिक्स मॉलजवळ हा अपघात झाला. या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आले आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरु केला आहे. मृताचे शवविच्छेदन करण्यासाठी पाठवण्यात आले आहे. हा अपघात इतका भीषण होता की, मन्ना यांचा जीव वाचू शकला नाही. अपघाताची माहिती कुटुंबियांना देण्यात आली. त्यांच्यावर दुखाचा डोंगर कोसळला आहे.या घटनेनंतर शोककळा पसरली आहे.