
तिरुवल्लूर पोलिसांनी (Thiruvallur Police) बुधवारी एका 33 वर्षीय व्यक्तीला अटक केली आहे. ज्याने कथितरित्या परदेशात राहणाऱ्या आपल्या पत्नीसाठी (Wife) विवाह प्रोफाइल (Marriage profile) तयार केले. पोलिसांनी सांगितले की, आरोपीने लग्नाची इच्छा निर्माण करून तिला घटस्फोटाच्या (Divorce) कागदपत्रांवर सही करून देण्याचा हेतू होता. तिरुवल्लूर जिल्ह्यातील वेल्लियूर (Velliur) गावातील एस ओमकुमार असे आरोपीचे नाव आहे. त्याचे काही वर्षांपूर्वी लग्न झाले होते आणि तो पत्नीसह परदेशात गेला होता. अलीकडेच या जोडप्यात वाद निर्माण झाले होते. तसेच ओंकुमारने नोकरी सोडली. तिरुवल्लूर जिल्ह्यातील आपल्या गावी परतला. तर त्याची पत्नी परदेशात राहिली, असे पोलिसांनी सांगितले.