SCO Summit In Kazakhstan: SCO शिखर परिषदेत परराष्ट्र मंत्री जयशंकर करणार भारताचे प्रतिनिधित्व; युक्रेन संघर्ष, सुरक्षा सहकार्यावर चर्चा होणार
S Jaishankar | (Image Credit - ANI Twitter)

SCO Summit In Kazakhstan: कझाकस्तान (Kazakhstan) मधील अस्ताना (Astana) येथे होणाऱ्या शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन (SCO) च्या वार्षिक शिखर परिषदेत परराष्ट्र मंत्री एस जयशंकर (External Affairs Minister Jaishankar) भारताचे प्रतिनिधित्व करतील. 3 आणि 4 जुलै रोजी होणाऱ्या शिखर परिषदेत प्रादेशिक सुरक्षा परिस्थिती आणि कनेक्टिव्हिटी आणि व्यापाराला चालना देण्याच्या मार्गांवर लक्ष केंद्रित करणे अपेक्षित आहे.

युद्धासह अनेक मुद्द्यांवर होणार चर्चा -

यादरम्यान अफगाणिस्तानातील परिस्थिती, युक्रेन संघर्ष आणि SCO सदस्य देशांमधील एकूण सुरक्षा सहकार्याला चालना देण्यावरही चर्चा होण्याची अपेक्षा आहे. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे. (हेही वाचा -Russia-Ukraine War Video: रशियाचा युक्रेनमधील खार्किव शहरात बॉम्ब हल्ला, महिला थोडक्यात बचावली (Watch Video))

शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशनमध्ये भारत, चीन, रशिया, पाकिस्तान, कझाकिस्तान, किर्गिस्तान, ताजिकिस्तान आणि उझबेकिस्तान यांचा समावेश आहे. हा एक प्रभावशाली आर्थिक आणि सुरक्षा गट आहे, जो सर्वात मोठ्या आंतर-प्रादेशिक आंतरराष्ट्रीय संस्थांपैकी एक म्हणून उदयास आला आहे. सहसा पंतप्रधान SCO शिखर परिषदेत सहभागी होतात. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी शिखर परिषदेच्या यशस्वितेसाठी कझाकिस्तानचे अध्यक्ष कॅसिम-जोमार्ट तोकायेव यांना भारताचा पूर्ण पाठिंबा व्यक्त केला.

रशिया आणि ऑस्ट्रिया या दोन देशांच्या नियोजित दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर मोदींनी SCO शिखर परिषदेला उपस्थित राहणार नाहीत. मोदींच्या दोन्ही देशांच्या दौऱ्याला अद्याप अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. सध्याचे अध्यक्ष म्हणून कझाकस्तान या शिखर परिषदेचे आयोजन करत आहे. भारत गेल्या वर्षी SCO चे अध्यक्ष होता. गेल्या वर्षी जुलैमध्ये व्हर्च्युअल स्वरूपात SCO शिखर परिषदेचे आयोजन केले होते.