Uttar Pradesh: धुमधडाक्यात केले लग्न; 5 महिन्यानंतर पत्नीचे गुपीत कळताच नवदेवाची थेट पोलीस ठाण्यात धाव
Representational Image (Photo Credits: unsplash.com)

लग्नानंतरची पहिली रात्र प्रत्येक नवविवाहित जोडप्यांसाठी (Newly Married Couple) खूप खास असते. ज्याला फर्स्ट नाईट (First Night) असेही म्हणतात. लग्नाच्या पहिल्या रात्री काही जोडपे नर्वस तर, काहीजण अधिक उस्तूक असतात. परंतु, उत्तर प्रदेशच्या (Uttar Pradesh) मुजफ्फरनगर (Muzaffarnagar) येथील एका व्यक्तीच्या लग्नाला पाच महीने झाले तरी, त्याची बायको त्याला जवळ येऊ देत नव्हती. यामुळे संबंधित व्यक्तीने आपल्या पत्नीची वैद्यकीय चाचणी केली. या वैद्यकीय चाचणीत आपली पत्नी किन्नर असल्याचे कळताच नवऱ्यासह त्यांच्या संपूर्ण कुटुंबियांना मोठा धक्का बसला आहे. या घटनेनंतर संपूर्ण परिसरात एकच खळबळ माजली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, उत्तर प्रदेशच्या सहारपूर येथे राहणाऱ्या एका तरूणाचे 28 ऑक्टोबर रोजी लग्न झाले होते. मुलाच्या लग्नानंतर कुटुंबात वधू आल्याने सर्वजण आनंद साजरा करत होते. दरम्यान, लग्नाच्या पहिल्या रात्री नवरदेव वधूच्या जवळ गेला. परंतु, तिने पतीला जवळच येऊ दिले नाही. हा प्रकार तब्बल पाच महिने सुरु होता. पत्नीच्या अशा वागण्यामुळे पतीला चांगला मनस्ताप होत होता. नेहमी काही तरी कारण सांगून पत्नी हनीमूनला नकार देत असल्याने पतीने तिची वैद्यकीय चाचणी केली. या वैद्यकीय चाचणी त्याची पत्नी किन्नर असल्याचे निष्पन्न झाले. हा अहवाल पाहिल्यानंतर नवऱ्याकडील मंडळीच्या पायाखालील जमीनच सरकली. त्यानंतर त्यांनी नवरीच्या आई वडिलांविरोधात फसवणुकीचा आरोप केला आहे. हे देखील वाचा- Jharkhand: नर्सिंग विद्यार्थ्यांची 'संयम' चाचणी घेण्याच्या नावाखाली स्वयंसेवी संस्थेचा संचालक करत होता लैंगिक शोषण; पोलिसांकडून अटक

याप्रकरणी स्थानिक पोलिसांनी कोणतीही तक्रार दाखल करून घेतली नाही. तसेच पोलिसांनी दोन्ही कुटुंबियांना समज देऊन हे प्रकरण मिटवले आहे. दरम्यान, मुलाच्या कुटुंबियांनी मुलीला सोबत ठेवण्यास नकार दिला आहे. त्यानंतर पोलिसांनी मुलीला तिच्या आई वडिलांसोबत पाठवून दिले आहे. घडलेला सर्वप्रकार धक्कादायक असून या घटनेनंतर तरूणांमध्ये भितीजनक वातावरण निर्माण झाले आहे.