Crime | Representational Image (Photo Credits: Pixabay)

बंगळुरू पोलिसांनी (Bangalore Police) एका 23 वर्षीय महिलेवर बलात्कार (Rape) करून तिची हत्या (Murder) केल्याच्या आरोपाखाली एका व्यक्तीला अटक (Arrested) केली आहे. कारण तिने दुसऱ्या पुरुषाशी लग्न केल्यानंतर संबंध सुरू ठेवण्यास नकार दिला होता. मंगळवारी रात्री पीडितेच्या घरी ही घटना घडली.  पोलिसांनी सांगितले की, आरोपीचे नाव मनोज असे आहे. पीडित तरुणी आणि आरोपीचे गेल्या वर्षभरापासून संबंध होते, पण महिलेच्या लग्नानंतर ते तणावाचे झाले होते, असे पोलिसांनी सांगितले. एका पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की, मनोज पीडितेच्या घरी गेला. तिने ज्या पुरुषाशी लग्न केले होते त्याऐवजी त्याच्याशी लग्न करण्यासाठी तिला पटवून देण्याचा प्रयत्न केला.

तिने नकार दिल्यावर त्याने तिच्यावर बलात्कार केला. उशीचा वापर करून तिची हत्या केली. त्यानंतर तो घटनास्थळावरून पळून आपल्या घरी गेला. रात्री दहाच्या सुमारास पीडितेचे आई-वडील घरी आल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. पोलिसांना गुन्ह्याची माहिती मिळाल्यानंतर, ते आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या मनोजला अटक करण्यासाठी गेले. त्याला जवळच्या रुग्णालयात हलवण्यात आले, जेथे त्याच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. हेही वाचा Congress Protest Over Adani Row: अदानी मुद्द्यावरुन काँग्रसचे आंदोलन, नवरदेवाच्या वेशात, पैशांची माळ घातलेल्या आंदोलकाचा व्हिडओ व्हायरल

पोलिसांनी सांगितले की, त्यांच्या तपासात समोर आले की, मनोज आणि पीडिता तीन वर्षांपूर्वी एकाच ठिकाणी काम करत होते. त्याने तिच्यासमोर लग्नाचा प्रस्ताव ठेवला पण तिने होकार दिला नाही. नंतर मनोजने फर्म सोडली आणि रिअल इस्टेट फर्ममध्ये रुजू झाला. वर्षभरापूर्वी ते पुन्हा फेसबुकवर भेटले. चॅटिंग सुरू केले आणि मनोजने तिला प्रपोज केले तेव्हा तिने ते स्वीकारले, असे पोलिसांनी सांगितले.

मात्र, पीडितेच्या आई-वडिलांनी तिचे लग्न दुसऱ्या व्यक्तीसोबत लावले, ज्यामुळे मनोज अस्वस्थ झाला. मंगळवारी त्याने पीडितेच्या घरी जाऊन तिची हत्या केल्याचा आरोप आहे. पोलिसांनी मनोजवरही बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. कारण त्याने पीडितेसोबत शारीरिक संबंध ठेवले होते. ते संमतीने लैंगिक संबंध होते की बलात्कार हे आम्हाला माहीत नाही. हेही वाचा Indian Army Cheetah Helicopter Crashed: भारतीय लष्कराचे हेलिकॉप्टर कोसळले, अरुणाचल प्रदेश राज्यातील मंडला हिल्स परिसरातील घटना

परंतु पीडितेच्या पालकांनी त्यांच्या तक्रारीत बलात्काराचा आरोप केला आहे आणि आम्ही हे प्रकरण हाती घेतले आहे, एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले. पोलीस अधिकारी मनोज बरा झाल्यानंतर पुढील चौकशीसाठी त्याला पोलीस कोठडीत घेण्यात येणार आहे.