ऑगस्टा वेस्टलँड प्रकरणी ख्रिस्तीयन मिशेलने उघड केले काँग्रेसच्या बड्या नेत्याचे नाव: ईडी
ख्रिस्तीयन मिशेल (Photo Credits-Twitter)

ऑगस्टा वेस्टलँड प्रकरणी (Augusta Westland Scam) ख्रिस्तीयन मिशेल (Christian Michel) ह्याने लाचखोरी बद्दल दिलेल्या हिशोबात असलेल्या डायरीमध्ये काँग्रेसच्या (Congress) बड्या नेत्यांचे नाव उघड केल्याचा दावा ईडी (ED) कडून करण्यात आला आहे. ही नावे अंमलबजावणी संचलनालयाने दाखल केलेल्या पुरवणी आरोपपत्रामध्ये ही माहिती आहे.

व्हीहीआयपी हेलिकॉप्टर घोटाळा प्रकरणी ईडीने गुरुवारी चौथे आरोपपत्र दाखल केले. मिळालेल्या माहितीनुसार, डायरीत नोंदवलेल्या FAM या नावाचा अर्श फॅमिली म्हणजे कुटुंब असा आहे. परंतु डायरीमध्ये नोंद असलेल्या संक्षिप्त शब्दांचा संबंध हवाई दल, अधिकारी, नोकरशहा, तत्कालीन सत्ताधरी आणि संरक्षण मंत्रालयाती अधिकारी यांना दिलेल्या लाचप्रकरणाशी असल्याचे ईडीने म्हटले आहे.(हेही वाचा-Rafale Deal Vs AgustaWestland: ऑगस्टा वेस्टलँड प्रकरणामुळे लोक राफेल विसरणार नाहीत: शिवसेना)

तर AP म्हणजे काँग्रेसमधील एका बड्या नेत्याचे नाव असल्याचा दावा ईडीने केला आहे. या व्यवहारात 3 कोटी युरोचा भ्रष्टाचार करण्यात आला आहे. तर मिशेल ह्याला दुबई येथून प्रत्यापर्णाद्वारे भारतात चौकशीसाठी आणण्यात आले असल्याने या माहितीचा खुलासा झाला असल्याचे सांगितले जात आहे.