गृह मंत्रालयाने सोमवारी (18 फेब्रुवारी) या 16 राज्यात आणि केंद्रशासित प्रदेशासाठी मंगळवारपासून एकच आपत्कालीन हेल्पलाईन क्रमांक 112 असा ठेवण्यात आला असून नारिकांना तत्काळ मदत या क्रमांकावरुन मिळणार असल्याचे जाहीर केले आहे. गृह मंत्री राजनाथ सिंह (Rajnath Singh) यांनी आज महिला सुरक्षित संबंधित विविध योजनांचे उद्घाटन केले आहे.
या देशात इमरजेंसी रिस्पॉन्स सपोर्ट सिस्टम सुरु करणे, इन्वेस्टिंग ट्रॅकिंग सिस्टिम फॉर सेक्सुअल ऑफसेंज आणि सुरक्षित शहर कार्यान्वित निगराणी पोर्टल असणार आहे. गृह मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार 16 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात ही कार्यप्रणाली सुरु करणार आहे.
या 16 राज्यात आपत्कालीन हेल्पलाईन क्रमांक एकच असणार आहे-
आंध्रप्रदेश,उत्तराखंड,पंजाब, केरळ, मध्य प्रदेश, राजस्थान, उत्तर प्रदेश, तेलंगणा, तमिळनाडू, गुजरात, पड्डुचेरी, लक्षद्वीप, अंदमान, दादर नगर हवेली, दमण-दीव आणि जम्मू-कश्मिर
पोलिसांसाठी 100, अग्निशमन 101, आरोग्य 108 आणि महिला हेल्प लाईन क्रमांक 1090 या सर्वासाठी एकच क्रमांक 112 एकीकृत रुप आहे. तसेच गृह मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी असे सांगितले की, आपत्कालीन सेवासुविधा पुरवण्यासाठी एखाद्या व्यक्तीने 112 क्रमांक डायल केल्यास आपत्कालिन प्रतिक्रिया केंद्रावर पॅनिक काळासाठी आपल्या स्मार्टफोनवरुन पावर बटन दाबून तुम्हाला मदतीचा हात मिळणार आहे.