Maharashtra Board HSC Result 2025 Expected Date: महाराष्ट्र बोर्डाच्या बारावीच्या परीक्षा (Maharashtra Board Class 12th Exams) संपल्या असून राज्यातील लाखो विद्यार्थी आता त्यांच्या बोर्डाच्या निकालाची 2025 (Board Results 2025) ची वाट पाहत आहेत. विद्यार्थ्यांची प्रतिक्षा आता लवकरच संपणार आहे. महाराष्ट्र बोर्डाचा बारावीचा निकाल (Maharashtra Board Class 12th Results) येत्या काही दिवसांत जाहीर होईल. राज्य शिक्षण मंडळाच्या वेबसाइटची क्षमता वाढविण्यासाठी आणि सायबर सुरक्षा मजबूत करण्यासाठी सात दिवसांत सविस्तर अहवाल सादर करण्याचे निर्देश माहिती तंत्रज्ञान मंत्री आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी अधिकाऱ्यांना दिल्याचं सांगण्यात येत आहे.
महाराष्ट्रात दहावी आणि बारावीच्या परीक्षेच्या निकालांच्या (HSC Exams Results 2025) घोषणेदरम्यान, वेबसाइटवर मोठ्या प्रमाणात ट्रॅफिक येते. त्यामुळे तांत्रिक अडचणींमुळे मोठी समस्या निर्माण होते. या पार्श्वभूमीवर, राज्याचे माहिती तंत्रज्ञान मंत्री आशिष शेलार यांनी सोमवारी अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली होती. या संयुक्त आढावा बैठकीत मंत्री आशिष शेलार यांनी महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ (MSBSHSE) आणि माहिती तंत्रज्ञान विभागाच्या अधिकाऱ्यांशी या विषयावर चर्चा केली. (हेही वाचा - Maharashtra HSC Result 2025: महाराष्ट्र बोर्डाचा इयत्ता 12 परीक्षा निकाल ऑनलाइन आणि एसएमएसद्वारे कसा पाहायचा? घ्या जाणून)
आशिष शेलार यांनी सांगितले की, लाखो विद्यार्थी त्यांचे परीक्षेचे निकाल तपासण्यासाठी एकाच वेळी वेबसाइटवर लॉग इन करतात. म्हणून, बोर्डाच्या वेबसाइटची नियमित लोड टेस्टिंग आणि क्षमता वाढवणे आवश्यक आहे. वेबसाइटच्या विद्यमान क्षमतेचे विश्लेषण करा आणि ती वाढवण्यासाठी उपाययोजना सुचवणारा अहवाल तयार करा. (हेही वाचा - Maharashtra SSC & HSC Results 2025 Dates: महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना दहावी आणि बारावीच्या निकालाची प्रतीक्षा; जाणून घ्या संभाव्य तारखा)
तांत्रिक बिघाडामुळे विद्यार्थी त्रस्त -
दरवर्षी महाराष्ट्र एसएससी आणि एचएससीच्या निकालांच्या घोषणेदरम्यान, वेबसाइटवर मोठ्या प्रमाणात ट्रॅफिक असल्याने तांत्रिक बिघाड निर्माण होतात. हजारो आणि लाखो विद्यार्थी एकाच वेळी साइटवर प्रवेश करण्याचा प्रयत्न करतात, ज्यामुळे सर्व्हर ओव्हरलोड होतो आणि अनेक वेळा वेबसाइट क्रॅश होते. यासंदर्भात बोलताना आशिष शेलार म्हणाले की, वेबसाइट सुरक्षा ही सध्या एक गंभीर समस्या आहे. मंडळाची वेबसाइट सुरक्षित करण्यासाठी कोणती पावले उचलावी लागतील याचा सविस्तर अहवाल सात दिवसांच्या आत सादर करण्यात यावा.
महाराष्ट्र बोर्ड बारावीच्या निकालाची 2025 संभाव्य तारीख -
मीडिया रिपोर्ट्सनुसार, महाराष्ट्र बोर्डाचा बारावीचा निकाल मे महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात जाहीर केला जाऊ शकतो, तर महाराष्ट्र एसएससीचा दहावीचा निकाल मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात जाहीर केला जाऊ शकतो.