
MH SSC Result Date 2025: यंदा मार्च महिन्यात दहावीच्या बोर्डाच्या परीक्षा (10th Board Exams) पार पडल्या. आता पालक आणि विद्यार्थ्यांना निकालाची उत्सुकता आहे. कारण, दहावीचं वर्ष हे प्रत्येकासाठी एक टर्निंग पोइंट असतं. दहावीच्या गुणांवर पुढे कोणत्या शाखेत प्रवेश घ्यायचा हे विद्यार्थी आणि त्यांचे पालक ठरवतात. लवकरच महाराष्ट्र राज्य परीक्षा बोर्ड दहावी व बारावी परीक्षांचे निकाल (Maharashtra State Examination Board 10th and 12th Exam Results) जाहीर करू शकते. तथापी, यंदा दहावीचा निकाल (SSC Result 2025) लवकर लागणार असल्याचं सांगण्यात येत आहे.
प्राप्त माहितीनुसार, यावर्षी दहावी आणि बारावी बोर्ड परीक्षांचे निकाल वेळेपूर्वी जाहीर केले जाणार असल्याचं सांगण्यात येत आहे. यंदा दहावीचा निकाल 15 मेच्या अगोदर जाहीर होण्याची शक्यता आहे. राज्यात दहावीची बोर्ड परीक्षा 21 फेब्रुवारी रोजी सुरू झाली. तसेच 17 मार्च रोजी दहावीच्या विद्यार्थ्यांचा शेवटचा पेपर पार पडला. परीक्षा संपल्यानंतर बोर्डाकडून दहावीचे पेपर तपासण्याची प्रक्रिया सुरू होती. तथापी, आता लवकर महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ दहावीचे निकाल जाहीर करू शकते. (हेही वाचा -Maharashtra Board HSC Result 2025 Expected Date: बारावीचा निकाल कधी लागणार? संभाव्य तारखेसंदर्भात मोठी अपडेट आली समोर)
दरम्यान, सध्या सोशल मीडियावर दहावीच्या निकालाच्या तारखेसंदर्भात अनेक दावे केले जात आहेत. मात्र, राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून अद्याप दहावीच्या निकालाबाबत कोणतीही अधिकृत तारीख सांगण्यात आलेली नाही. (हेही वाचा - Maharashtra HSC Result 2025: महाराष्ट्र बोर्डाचा इयत्ता 12 परीक्षा निकाल ऑनलाइन आणि एसएमएसद्वारे कसा पाहायचा? घ्या जाणून)
याशिवाय, दहावीच्या विद्यार्थ्यांप्रमाणे बारावीचे विद्यार्थी देखील निकालाकडे वाट लावून बसले आहेत. बारावीचा निकाल देखील मे महिन्यात लागण्याची शक्यता आहे. बारावीची परीक्षा 11 फेब्रुवारी ते 18 मार्च या कालावधीत बारावीची घेण्यात आली होती.