NDA, NA Examination 2018 Results: पाहा किती जणांची झाली निवड, इथे पाहा तुमचा निकाल
प्रातिनिधीक प्रतिमा | (Photo Credits: File Photo)

संघ लोक सेवा आयोग (Union Public Service Commission)ने नॅशनल डिफेन्स अॅकेडमी (NDA) आणि नेवल अॅकेडमी (NA) चा 2018 चा निकाल जाहीर केला आहे. यूपीएससी (UPSSC) द्वारे 9 डिसेंबर 2018 रोजी परीक्षा घेतली होती. या परीक्षेचा निकाल जाहीर करणयात आला आहे. प्राप्त माहितीनुसार जारी करण्यात आलेल्या मेरीट सूचीमध्ये 520 उमदवारांचीच निवड करण्यात आली आहे.

2 जुलै 2019 रोजी आर्मी, नेव्ही आणि एअर फोर्स विंग्जसाठी एनडीए 142 वाा कोर्स आणि नेव्हल अॅकेडमीसाठी 104 वा इंडिनय नेव्हल अॅकेडमी कोर्स सुरु करण्यात येईल. यूपीएससीची परीक्षा वर्षातून 2 वेळा आयोजित केली जाते. ज्यात पहिला एनडीए I आणि दुसरा एनडीए II असे विभाग पडतात. (हेही वाचा, CBSE, ICSE बोर्ड परीक्षांचे निकाल Cut Off List साठी स्पर्धा वाढणार? महाराष्ट्र बोर्ड विद्यार्थ्यांच्या मनात साशंकता)

जे विद्यार्थी किंवा इच्छूक उमेदवारांना आपला निकाल पाहायचा आहे. त्या मंडळींनी यूपीएससीची अधिकृत वेबसाईट www.upsc.gov.in वर जाऊन आपला निकाल पाहायला काहीच हरकत नाही.