Maharashtra Juinior College Cut Off List 2019: सीबीएसई (CBSE) आणि आयसीएसईच्या (ICSE) विद्यार्थ्यांचे दहावी आणि बारावीचे निकाल लागले आहेत. या निकालामध्ये दोन्ही बोर्डाच्या विद्यार्थ्यांना घवघवीत यश मिळाल्याने आता महाराष्ट्र राज्य बोर्डाच्या विद्यार्थ्यांमध्ये निकालाची उत्सुकता वाढली आहे. यासोबतच यंदा ज्युनियर कॉलेजमध्ये कट ऑफ लिस्टसाठी स्पर्धा अधिक तीव्र होणार असल्याची भीती विद्यार्थ्यांमध्ये वाढली आहे. यंदा मुंबई (Mumbai), पुणे (Pune) शहरातील कट ऑफ लिस्ट (Cut Off List) सुमारे 2-6% नी वाढण्याची शक्यता आहे. SSC, HSC 2019 Result Date: दहावी, बारावी च्या विद्यार्थ्यांचा निकाल 10 जून पूर्वी maharesults.nic.in या शिक्षण मंडळाच्या अधिकृत वेबसाईटवर लागणार - MSBSHSE ची माहिती
टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, मुंबईमध्ये 11 वी प्रवेशासाठी कट ऑफ लिस्ट अंदाजे 2-6% नी वाढण्याची शक्यता आहे. यंदा 95% वर मार्क्स मिळवणार्यांच्या यादीमध्ये सुमारे 40% वाढ झाली आहे. Board Exam Results 2019: महाराष्ट्रामध्ये SSC, HSC, CBSE, ISCE बोर्डाच्या 10-12 वीच्या विद्यार्थ्यांना पास होण्यासाठी किमान किती टक्के गुण हवेत?
महाराष्ट्र बोर्डामध्ये इंटर्नल परीक्षा बंद करण्यात आल्या आहेत. त्यांच्या तुलनेमध्ये इतर बोर्डाच्या विद्यार्थ्यांमध्ये इंटर्नल मार्क्सवर अधिक भर दिला जातो. त्यामुळे त्यांची एकून टक्केवारी वाढलेली दिसते. यंदा वाढलेल्या टक्केवारीसोबतच आरक्षणाची टक्केवारीदेखील वाढल्याने विद्यार्थ्यांना त्यांच्या पसंतीचे कॉलेज मिळणार का? या चिंतेमध्येही भर पडली आहे.