युनियन पब्लिक सर्विस कमीशन (UPSC) मध्ये विविध पदांसाठी नोकर भरती करण्यात येणार आहे. यासाठी एमबीबीएस-लॉ केलेल्या विद्यार्थ्यांना या नोकर भरतीचा लाभ घेता येणार असून त्यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरायचा आहे. विविध पदांसाठी एकूण 67 रिक्त जागा आहेत. अर्ज भरण्यासाठी सुरुवात झाली असून शेवटची तारीख 14 नोव्हेंबर देण्यात आली आहे. तसेच अपंगांसाठी काही जागा राखीव ठेवण्यात आल्या आहेत.
अर्ज करणाऱ्या उमेदवारांची वयोमर्यादा ठरवण्यात आली आहे. त्यानुसार उमेदवाराचे वय कमीतकमी 30 वर्ष असावे. तर जाणून घ्या कोणत्या पदासाठी किती जागा रिक्त आहेत.(खुशखबर! 5 वर्षानंतर मिळणारी ग्रॅज्युटी आता वर्षभरातच मिळण्याची शक्यता; ही योजना लवकरच अमलात आणण्याचा मोदी सरकारचा प्रयत्न)
>>कंपनी प्रॉसिक्युटर पदासाठी एकूण 11 जागा
>>प्रॉसिक्युटर, सीरियस फ्रॉड इन्विस्टिगेशन ऑफिस मध्ये 1 रिक्त पद
>>ज्युनिअर सायंन्टिफिक ऑफिसर, सेंट्रल फॉरेंसिक सायन्स लॅबोरेटरी, फोरेंसिक सायन्स सर्विस मिनिस्ट्री ऑफ होम मिनिस्ट्री-2 जागा
>>डायरेक्टर (स्टाफ ट्रेनिंग प्रोडिक्टिव्हिटी)- 1 जागा
>>स्पेशालिस्ट ग्रेड III, स्वास्थ आणि परिवार कल्याण विभाग- 7 जागा
>> स्पेशालिस्ट ग्रेड III (ऑब्सटेक अॅन्ड गायनी)- 9 जागा
>> स्पेशालिस्ट ग्रेड III (नेत्र विज्ञान, ऑप्थेल्मोलॉजी)- 2 जागा
तसेच शैक्षणिक गुणवत्तेनुसार उमेदवाराने कोणत्याही मान्यताप्राप्त संस्थेकडून पदवी घेतलेली असावी. अधिक माहितीसाठी UPSC च्या अधिकृत संकेस्थळावर मिळणार आहे.