Credit -File Photo

UPSC ने 2024-2025 च्या त्यांच्या परीक्षांच्या तारखा जाहीर केल्या आहेत. विविध नोकरभरतींसाठी या परीक्षा घेतल्या जातात. यामध्ये महत्त्वाच्या परीक्षांच्या तारखा आणि परीक्षेचा कालावधी देखील जाहीर करण्यात आला आहे, पण त्या भविष्यात बदलू देखील शकतात अशी माहिती देण्यात आली आहे. Union Public Service Commission कडून जारी तारखांमध्ये CSE Prelims आणि Mains च्या परीक्षेमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. CSE Prelims परीक्षा 25 मे दिवशी होणार आहे. केंद्राकडून UPSC ला नोकरशाहीतील पार्श्विक प्रवेशासाठी नवीन जाहिरात रद्द करण्याचे आदेश .

2024-25 मधील महत्त्वाच्या परीक्षा कधी आणि कोणत्या?

Reserved for UPSC RT/ Examination

  • परीक्षेची तारीख : 11 जानेवारी 2025
  • किती दिवस : 2 दिवस

Combined Geo-Scientist (Preliminary) Examination, 2025

  • नोटिफिकेशनची तारीख - 2 सप्टेंबर 2024
  • अर्ज करण्याची अंतिम मुदत- 24 सप्टेंबर 2024
  • परीक्षेची तारीख- 9 फेब्रुवारी 2025
  • परीक्षा किती दिवस : 1

Engineering Services (Preliminary) Examination, 2025

  • नोटिफिकेशनची तारीख - 18 सप्टेंबर 2024
  • अर्ज करण्याची अंतिम मुदत- 8 ऑक्टोबर 2024
  • परीक्षेची तारीख- 9 फेब्रुवारी 2025 परीक्षा किती दिवस : 1

Civil Services (Preliminary) Examination, 2025

  • नोटिफिकेशनची तारीख - 22 जानेवारी 2025
  • अर्ज करण्याची अंतिम मुदत- 11 फेब्रुवारी 2025
  • परीक्षेची तारीख- 25 मे 2025
  • परीक्षा किती दिवस : 1

Civil Services (Main) Examination, 2025

परीक्षेची तारीख- 22 ऑगस्ट 2025

परीक्षा किती दिवस : 5

Indian Forest Service (Main) Examination, 2025

  • परीक्षेची तारीख- 16 नोव्हेंबर 2025
  • परीक्षा किती दिवस : 7

विद्यार्थ्यांना परीक्षेमधील बदल वेळोवेळी सूचित केले जातील मात्र त्यासाठी त्यांना वरचे वर अधिकृत वेबसाईट वर लक्ष ठेवणं आवश्यक आहे.

UPSC Civil Services Preliminary Examinations 2024 यंदा 16 जूनला पार पडल्यानंतर आता यूपीएससी कडून Civil Services Mains Examination 2024 ची तयारी सुरू झाली आहे. यंदा प्रिलिम्सची परीक्षा 1.34 मिलियन पेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी दिली आहे. दोन शिफ्ट मध्ये ही परीक्षा झाली असून 1 जुलै 2024 दिवशी प्रिलिम्सचा निकाल जाहीर झाला आहे. यापैकी 14,627 विद्यार्थी मेन्स परीक्षेसाठी पात्र ठरले आहेत.

UPSC Civil Services Mains Examination 2024 यंदा 20 ते 29 सप्टेंबर दरम्यान होणार आहे. सकाळी 9 ते 12 हे पहिलं सत्र असेल तर दुपारी 2.30 ते 5.30 हे दुसरं सत्र असणार आहे.