Bombay University (PC - Twitter/ @airnews_mumbai)

सीईटी सेल (CET Cell)  कडून घेतली जाणारी परीक्षा आणि मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा एकाच दिवशी येत असल्याने आता मुंबई विद्यापीठाने त्यांच्या वेळापत्रकामध्ये बदल केले आहेत. 24 मार्च ते 3 एप्रिल दरम्यान होणार्‍या मुंबई विद्यापीठाच्या (University Of Mumbai) परीक्षा आता 4 एप्रिल ते 23 एप्रिल 2025 दरम्यान होतील असे सांगण्यात आले आहे. मुंबई विद्यापीठाकडून सुधारित वेळापत्रक जारी करण्यात आले आहे.

यामध्ये MCA, MBA-MMS, B-Design,B.Ed, M.Ed यांच्या सीईटीचा समावेश आहे. या सीईटी परीक्षा व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश घेण्यासाठी आवश्यक आहेत. अनेक विद्यार्थी संघटनांनी परीक्षेच्या तारखेमध्ये बदल करण्यासाठी विद्यापीठाला पत्र लिहलं होतं. विद्यार्थ्यांची मागणी लक्षात घेता आता विद्यापीठाने बदल केले आहेत.

मुंबई विद्यापीठाच्या सुधारित वेळापत्रकाबद्दलचे अपडेट्स

विज्ञान शाखेचं बदललेलं वेळापत्रक

कॉमर्स शाखेचं बदललेलं वेळापत्रक

आर्ट्स शाखेचं बदलेलं वेळापत्रक

या सुधारित तारखेपासून TYBSc Data Science, Computer Science, Biotechnology, आणि Information Technology या विषयांच्या परीक्षा सुरू होतील. सुरुवातीला 24 मार्च ते 3 एप्रिल या कालावधीत होणाऱ्या The Commerce and Management exams आता 5 एप्रिल ते 16 एप्रिल या कालावधीत हलवण्यात आल्या आहेत, तर कला विषयाच्या परीक्षा - ज्या मूळ 26 मार्च रोजी सुरू होणार होत्या - त्या 5 एप्रिल ते 23 एप्रिल या कालावधीत घेण्यात येतील.