बारावीचा निकाल (HSC Result) लागल्यानंतर आता मुंबई विद्यापीठाने (University of Mumbai) शैक्षणिक वर्ष 2023-24 च्या प्रवेश प्रक्रियेचं वेळापत्रक जारी केलं आहे. पदवीच्या प्रवेशासाठी ऑनलाईन, ऑफलाईन प्रवेशाची प्रक्रिया आज 27 मे पासून सुरू झाली आहे. फॉर्मची विक्री 12 जून पर्यंत सुरू राहणार आहे. तर पहिली मेरीट लिस्ट 19 जून दिवशी लागणार आहे. कोर्स, कॉलेज कोणतेही असले तरीही विद्यार्थ्यांना Mumbai University pre-enrollment करणं बंधनकारक आहे. यामधून दिला जाणारा रजिस्ट्रेशन नंबर नंतर अॅडमिशन प्रक्रियेमध्ये महत्त्वाची भूमिका पार पाडणार आहेत.
इन हाऊस कोटा आणि मायनॉरिटी कोटा द्वारा केलं जाणारं अॅडमिशन संबंधित कॉलेज मध्ये केलं जाणार आहे. 19 जूनला जारी होणारी पहिली मेरीट लिस्ट पाहिल्यानंतर विद्यार्थ्यांकडे 27 जून पर्यंत त्यांचं अॅडमिशन कंफर्म करण्यासाठी वेळ असणार आहे. त्यानंतर 28 जूनला दुसरी मेरीट लिस्ट जारी होणार आहे. त्यानंतर 5 जुलै पर्यंत त्यांना प्रवेश घेण्यासाठी वेळ दिला जाणार आहे. तिसरी आणि अंतिम मेरीट लिस्ट 6 जुलै दिवशी जारी होणार आहे. University of Mumbai मध्ये BSc Mathematics Exam च्या निकालात गंभीर चूक; अनेक विद्यार्थ्यांना चक्क 100 पैकी 115 गुण .
पहा मुंबई विद्यापीठाचं वेळापत्रक
Admission Notification: Pre-Admission Online Enrolment will be start from 27th May, 2023, https://t.co/4qLby4vSM6 pic.twitter.com/iWwHRCNYQE
— University of Mumbai (@Uni_Mumbai) May 25, 2023
बहुतेक महाविद्यालये एचएससीच्या गुणांच्या आधारे विद्यार्थ्यांना प्रवेश देतात. काही कॉलेज मध्ये त्यांच्या स्वत: च्या प्रवेश परीक्षा घेतल्या जाणार आहेत. यंदाच्या प्रवेशासाठी मिठीबाई कॉलेज आणि एनएम कॉलेजद्वारे कॉमन युनिव्हर्सिटी एंट्रन्स टेस्ट (CUET) चाही विचार केला जात आहे. सेंट झेवियर्स कॉलेजमध्ये प्रवेश घेण्यासाठी जूनच्या पहिल्या सहामाहीत झेवियर्स एन्ट्रन्स टेस्ट (XET) घेतली जाईल आणि सेल्फ-फायनान्सिंग प्रोग्राम्ससाठी आयोजित जय हिंद कॉमन ऑनलाइन प्रवेश परीक्षा 15 जून रोजी होईल.