मुंबई विद्यापीठामधील (University of Mumbai) अजून एक गजब कारभार समोर आला आहे. विद्यापीठाने चक्क विद्यार्थ्यांना 100 पैकी 115 गुण दिल्याची ही बाब आहे. हा प्रकार बीएसस्सी मॅथॅमेटिक्सच्या परीक्षेमधील आहे. सध्या मुंबई विद्यापीठाच्या या बाबीवरून अनेकजण जोक्स, मिम्स, मजेशीर मेसेज शेअर करत आहेत. हिंदूस्थान टाईम्सच्या रिपोर्ट्सनुसार, मुंबई विद्यापीठाने BSc Mathematics examination ची परीक्षा घेतली. मागील वर्षी नोव्हेंबर महिन्यात 5 व्या सेमिस्टर मध्ये ही परीक्षा झाली. त्या परीक्षेचा निकाल आता मागील आठवड्यात जाहीर झाला आहे. त्या निकालात विद्यापीठाची ही चूक समोर आली आहे.
अनेकांना हे अशाप्रकारे 100 पैकी 115 गुण कसे काय देण्यात आले? यावर बोलताना सिनियर सिनेट सदस्य संजय वायरळ यांनी दिलेल्या प्रतिक्रियेमध्ये 'काही विद्यार्थी परीक्षेला उपस्थित असूनही अनुपस्थित दाखवले गेले होते. तसेच विद्यापीठाने काहींच्या निकालातही गडबड केली आहे. विद्यापीठाने विद्यार्थ्यांना 100 पैकी 115 मार्क्स देण्याचा काही 104 मार्क्स देण्याचा अजब प्रकार देखील केला आहे.
रिपोर्ट्सनुसार, ही गडबड बीएसस्सी च्या 5 व्या सेमिस्टरमध्ये ग्रुप थेअरी सब्जेक्ट मध्ये झाली आहे. निकालाच्या पीडीएफ फाईल मध्ह्ये काही विद्यार्थ्यांना 100 मार्काच्या पेपर मध्ये 100 पेक्षा जास्त गुण दिलेले दिसत आहेत. दरम्यान विद्यापीठाकडून अशा चूका वारंवार होत असल्याचं संजय म्हणाले आहेत. अशाप्रकारे 100 मार्कांच्या पेपरमध्ये त्यापेक्षा अधिक गुण देणं हा प्रकार म्हणजे कहर आहे.
मुंबई विद्यापीठाने त्यांच्याकडून झालेली ही चूक मान्य केली आहे. सॉफ्टवेअर मध्ये काही तांत्रिक दोष झाला असेल असं त्यांनी कारण पुढे केले आहे. ही चूक सुधारून आता पुन्हा नव्याने निकाल दिला जाईल असं विद्यापीठाने म्हटलं आहे.