निकाल । File Image

National Testing Agency (NTA) कडून UGC NET June Result 2025 जाहीर करण्यात आला आहे. आज 21 जुलै दिवशी अधिकृत वेबसाईट वर निकाल जाहीर करण्यात आला आहे. जून महिन्यात परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांना आता त्यांचा निकाल ugcnet.nta.ac.in या वेबसाईट वर पाहता येणार आहे. निकाल पाहण्यासाठी तुमचा अ‍ॅप्लिकेशन नंबर आणि जन्म तारीख पोर्टलवर टाकून लॉगिन करता येणार आहे. जूनमध्ये नोंदणी केलेल्या 10,19,751 उमेदवारांपैकी 7,52,007 जणांनी परीक्षेला हजेरी लावली. त्यांच्या कामगिरी आणि निर्धारित कट-ऑफ निकषांवर आधारित, जेआरएफ आणि असिस्टंट प्रोफेसर पदासाठी 5269 उमेदवार पात्र ठरले. सहाय्यक प्राध्यापक आणि पीएचडी प्रवेशासाठी 54885 पात्र ठरले तर 1,28,179 जण फक्त पीएचडी प्रवेशासाठी पात्र ठरले आहेत.

 कसा पहाल UGC NET June Result 2025 ऑनलाईन

  • अधिकृत वेबसाईट ugcnet.nta.ac.in वर क्लिक करा.
  • UGC NET June 2025 result link वर क्लिक करा.
  • आता तुमचे login credentials टाका.
  • आता स्क्रिन वर निकाल दिसेल तो डाऊनलोड करू शकता.

UGC NET June परीक्षा यंदा जून महिन्यात घेण्यात आली होती. या परीक्षेनंतर निकालाची provisional answer key वेबसाईट वर 5 जुलै दिवशी जारी करण्यात आली होती. तर objection window ही 6 जुलै दिवशी ऑक्टिव्हेट करण्यात आली होती. 8 जुलै पर्यंत उमेदवारांना आक्षेप नोंदवण्यासाठी वेळ देण्यात आली होती.

UGC NET ही राष्ट्रीय स्तरावरील पात्रता परीक्षा आहे जी तीन प्राथमिक उद्देशांसाठी घेतली जाते. यामध्ये  सहाय्यक प्राध्यापक पदासाठी भरती, ज्युनियर रिसर्च फेलोशिप (JRF) प्रदान करणे आणि भारतीय महाविद्यालये आणि विद्यापीठांमध्ये पीएचडी कार्यक्रमांना प्रवेश. सहाय्यक प्राध्यापक पदासाठी पात्र असलेले लोक देशभरातील महाविद्यालये आणि विद्यापीठांमध्ये अध्यापन पदांसाठी अर्ज करण्यास पात्र आहेत. जेआरएफसाठी पात्र ठरलेले उमेदवार विद्यापीठांमध्ये निधीप्राप्त संशोधन फेलोशिपसाठी पात्र आहेत आणि ते सहाय्यक प्राध्यापक पदांसाठी देखील अर्ज करू शकतात.