Representational Image (Photo Credits: unsplash.com)

UGC NET Admit Card 2020: नॅशनल टेस्टिंग एजन्सी (National Testing Agency) द्वारे यूसीजी नेट (UGC NET) परीक्षेचे अॅडमिट कार्ड (Admit Card) जारी करण्यात आले आहे. यूजीसी नेट परीक्षेचे अॅडमिट कार्ड एनटीएच्या (NTA) अधिकृत वेबसाईट (Official Website) ugcnet.nta.nic.in वर उपलब्ध आहे. त्यामुळे या परीक्षेसाठी बसणारे विद्यार्थ्यी वेबसाईटवरुन अॅडमिट कार्ड डाऊनलोड करु शकतात. सुरुवातीला ही परीक्षा 16 सप्टेंबर रोजी होणार होती. मात्र ती पुढे ढकलण्यात आली. परीक्षेची डेटाशिट देखील अधिकृत वेबसाईट ugcnet.nta.nic.in उपलब्ध आहेत. त्यामुळे विद्यार्थी ऑनलाईनही ती पाहू शकतात.

नॅशनल टेस्टिंग एजन्सीने जारी केलेल्या नव्या तारखेनुसार, यूजीसी नेट परीक्षा 24 सप्टेंबर ते 5 नोव्हेंबर या कालावधीत पार पडणार आहे. दोन सेशनमध्ये या परीक्षा घेतल्या जाणार आहेत. सकाळी 9 ते दुपारी 12 आणि संध्याकाळी 3 ते 6 असे दोन सेशन असतील. इंग्रजी, कॉमर्स आणि हिंदी या विषयांसाठी दोन सत्रात परीक्षा होतील, अशी माहिती समोर येत आहे. NET परीक्षेच्या तारखा आयसीआयर परीक्षा AIEEA-UG/PG आणि AICE-JRF/SRF (Ph.D.) दरम्यान येत असल्याने नेट ची परीक्षेची तारीख बदलण्यात आली. तर यापूर्वी यूजीसी नेट परीक्षा 15 जून रोजी होणार होत्या. मात्र कोरोना व्हायरस संकटामुळे त्या पुढे ढकलण्यात आल्या. (UGC-NET Exam 2020 Postponed: एनटीए कडून युसीजी नेट परीक्षेच्या तारखेत बदल; 24 सप्टेंबर पासून होणार सुरुवात)

अॅडमिट कार्ड कसे डाऊनलोड कराल?

# सर्वप्रथम ugcnet.nta.nic.in या अधिकृत वेबसाईटला भेट द्या.

# वेबसाईटच्या होमपेजवर अॅडमिट कार्ड दिसेल, त्यावर क्लिक करा.

# पेज ओपन झाल्यावर तिथे आपला रजिस्ट्रेशन नंबर आणि इतर माहिती भरा.

सब्मिट बटणावर क्लिक करा.

# तुमचे अॅडमिट कार्ड स्क्रिनवर दिसेल.

# अॅडमिट कार्ड तुम्ही डाऊनलोड करु शकता. तसंच त्याची प्रिंटही घेऊ शकता.

यूजीसी नेट परीक्षा या एनटीएकडून देशभरात  तब्बल 81 विषयांसाठी घेतल्या जातात. यूजीसीच्या देशभरातील विद्यापीठं, महाविद्यालयं आणि शैक्षणिक संस्थांमध्ये असिस्टंट प्रोफेसर (Assistant Professor) आणि ज्युनियर रिसर्च फेलोशिप (Junior Research Fellowship) मिळवण्यासाठी UGC NET ही पात्रता परीक्षा असते.