UGC-NET Exam 2020 Postponed: एनटीए कडून युसीजी नेट परीक्षेच्या तारखेत बदल; 24 सप्टेंबर पासून होणार सुरुवात
प्रतिकात्मक फोटो (Photo Credit: PTI)

UCH-NET 2020: नॅशनल टेस्टिंग एजेंसी (NTA) यांनी 16 सप्टेंबर पासून सुरु होणाऱ्या युसीजी नेट परीक्षा स्थगित केली आहे. त्यामुळे आती ही परीक्षा 24 सप्टेंबर पासुन सुरु होणार आहे. परीक्षेसंबंधित विस्तारित वेळापत्रक जाहीर करण्यात येणार आहे. त्याचसोबत याचे अॅडमिट कार्ड ही जारी केले जाणार आहे. दरम्यान, युसीजी नेट परीक्षा 16 ते 18 सप्टेंबर आणि 21 ते 25 सप्टेंबरच्या कालावधीत पार पडणार आहे. नव्या शेड्युअल नुसार आता परीक्षा 24 सप्टेंबर पासून सुरु होणार आहे.(GATE 2021 online Registration: IIT- Bombay कडून गेट 2021 साठी ऑनलाईन रजिस्ट्रेशन appsgate.iitb.ac.in वर नियोजित वेळेच्या आधीच सुरू)

एनटीएने सोमवारी एक नोटीस जाहीर करत असे म्हटले आहे की, NET परीक्षेच्या तारखा आयसीआयर परीक्षा AIEEA-UG/PG आणि AICE-JRF/SRF (Ph.D.) 2020- 21 वेळी येत होत्या. त्यामुळेच नेट ची परीक्षा रिशेड्युअल करण्यात आली आहे. काही विद्यार्थी आयसीएआर आणि युसीजी नेट या दोन्ही परीक्षांसाठी बसले आहे. तर आता युसीजीची परीक्षा 24 सप्टेंबरला पार पडणा आहे. उमेदवारांनी ताज्या अपडेट्ससाठी अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी असे आवाहन करण्यात आले आहे.(Health Ministry Issues Revised SOP: कोविड-19 संकट काळात पार पडणाऱ्या परीक्षांसाठी आरोग्य मंत्रालयाने जारी केल्या नव्या मार्गदर्शक सूचना)

ICAR AIEEA-UG / PG आणि AICE-JRF / SRF (Ph.D.) 2020-21 परीक्षा 16,17,22 आणि 23 सप्टेंबरला पार पडणार होती. UCG-NET ची परीक्षा यापूर्वी 15 जूनला पार पडणार होती. पण कोरोना व्हायरसमुळे परीक्षा स्थगित केली होती.

UCG-NET परीक्षा NTA द्वारे 81 विषयांसाठी असिस्टंट प्रोफेसर आणि ज्युनिअर रिसर्च फेलोशिप (JRF) या असिस्टंट पदासाठी आयोजिक करण्यात येणार आहे. परीक्षेत दोन पेपर असतात. परीक्षा कंप्युटर आधारित टेस्ट मोड आयोजित केली जाणार आहे.