कोविड-19 (Covid-19) संकटाच्या पार्श्वभूमीवर नीट (NEET), जेईई (JEE) आणि इतर परीक्षांचा वाद प्रचंड गाजला. दरम्यान कोरोना व्हायरस (Coronavirus) संकटात काळात या सर्व परीक्षा पार पडणार असल्याने खबरदारी म्हणून आरोग्य मंत्रालयाकडून मार्गदर्शन सूचना जारी करण्यात आल्या आहेत. परीक्षा काळात कोरोना व्हायरसचा प्रचार रोखण्यासाठी आरोग्य मंत्रालयाकडून (Health Ministry) SOP (Standard Operating Procedure) जारी करण्यात आली आहे. (NEET Exam 2020 रद्द करण्याच्या याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या; 13 सप्टेंबरला आयोजित परीक्षा होणार)
सर्व विद्यापीठे, शैक्षणिक संस्था, परीक्षा अधिकारी आणि केंद्र यांनी विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा विचार करुन आयोजन करावे, असे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून सांगण्यात आले आहे. तसंच विद्यार्थ्यांनी सोशल डिस्टसिंगच्या नियमांचे पालन करावे आणि मास्कचा वापर करावे, असेही सांगण्यात आले आहे.
ANI Tweet:
Health Ministry issues Revised SOP (standard operating procedure) on preventive measures to be followed while conducting examinations to contain the spread of #COVID19. pic.twitter.com/kIMfZlGnDH
— ANI (@ANI) September 10, 2020
विद्यार्थ्यांनी एकमेकांपासून कमीत कमी 6 फूटाचे अंतर ठेवावे. मास्क घालणे बंधनकारक आहे. हात स्वच्छ करण्यासाठी सॅनिटायझरचा वापर करावा. उघड्यावर थुंकणे निषिद्ध आहे. तसंच आरोग्य सेतू अॅप डाऊनलोड करणे आवश्यक असल्याचे सांगण्यात आले आहे. या नव्या गाईडलाईन्सनुसार, केवळ कन्टेमेंट झोन बाहेरील परीक्षा केंद्रात परीक्षा होतील. तसंच एकाच दिवशी परीक्षा केंद्रांवर गर्दी होऊ नये यासाठी विद्यापीठांनी नियोजन करावे. यासाठी पर्यवेक्षकांची टीम उभी करावी, असेही आरोग्य मंत्रालयाकडून सांगण्यात आले आहे.
ऑनलाईन परीक्षेदरम्यान कम्प्युटर, माऊस, की-बोर्ड, डेस्क यांचे सॅनिटायझेशन होणे अत्यंत गरजेचे आहे. दरम्यान देशात 13 सप्टेंबर रोजी नीट परीक्षा आयोजित करण्यात आली आहे. यासाठी देशभरातील तब्बल 15 लाखांहून अधिक विद्यार्थी बसले आहेत. या विद्यार्थी आणि पालकांना रेल्वे, मेट्रोने प्रवास करण्याची मुभा देण्यात आली आहे. कोरोना व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव पाहता विद्यार्थ्यांनी पुरेशी काळजी घेणे आवश्यक आहे.