NEET Exam (Photo Credis- Facebook)

भारतामध्ये कोरोना व्हायरसच्या (Coronavirus)  सावटाखाली जेईई मेन्सच्या परीक्षा (JEE Mains Exams 2020)  झाल्यानंतर आता वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी नीट परीक्षा (NEET Exam 2020)  पुढे ढकलण्यासाठी, रद्द करण्यासाठी काहींनी याचिका दाखल केल्या होत्या. मात्र सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) आज या सार्‍या याचिकांना फेटाळून लावल्या आहेत. दरम्यान नीट परीक्षा 2020 यंदा 13 सप्टेंबर दिवशी होणार आहे. सर्वोच्च न्यायालयामध्ये न्यायमूर्ती अशोक भूषण (Justice Ashok Bhushan)  यांच्या खंडपीठाखाली ही सुनावणी झाली आहे.

आज सर्वोच्च न्यायालयामध्ये अशोक भूषण यांनी याचिकांचा आम्ही स्वीकार करू शकत नाही असं सांगत त्यांनी सार्‍या याचिका फेटाळत परीक्षा 13 सप्टेंबरला होणार असल्याचं सांगितलं आहे. NEET Admit Card 2020 Released: नॅशनल टेस्टिंग एजंसी कडून नीट 2020 परीक्षा अ‍ॅडमीट कार्ड जारी; ntaneet.nic.in वरून करू शकाल डाऊनलोड

ANI Tweet

दरम्यान काही दिवसांपूर्वी भारतातील 6 राज्यातील मंत्र्यांनी नीट परीक्षा 2020 पुढे ढकलण्याची मागणी करत याचिका केली केली. त्यामध्येही 17 ऑगस्टच्या निर्णयाचा पुन्हा विचार व्हावा अशी मागणी करण्यात आली होती मात्र ती देखील सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली होती.

भारतामध्ये 1-6 सप्टेंबर दरम्यान जेईई मेन्सची परीक्षा झाली आहे. तर उद्या निकाल देखील जाहीर होणार आहे. यंदा 13 सप्टेंबर नीट 2020 परीक्षा असल्याने काही दिवसांपूर्वी महाराष्ट्रातील एमपीएससीची परीक्षा देखील पुढे ढकलण्यात आली.

यंदा नीट 2020 परीक्षेसाठी सुमारे 15.97 लाख विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोशल डिस्टन्सिंग पाळत सुरक्षित परीक्षा पार पडाव्यात म्हणून 2546 वरून 3843 परीक्षा केंद्र उपलब्ध करून दिली जाणार आहेत. नीट 2020 ची परीक्षा दुपारी 2-5 दरम्यान पार पडेल. लेखी स्वरूपात ही परीक्षा होणार असून एकाच स्लॉटमध्ये पार पडणार आहे. भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणी बायोलीजी (बॉटनीआणि झुऑलॉजी) विषयाच्या 180 प्रश्नांचा समावेश असेल. यासाठी बहू पर्यायी प्रश्नावली दिली जाते.