NEET Admit Card 2020 Released: नॅशनल टेस्टिंग एजंसी कडून नीट 2020 परीक्षा अ‍ॅडमीट कार्ड जारी;  ntaneet.nic.in वरून करू शकाल डाऊनलोड
Online | Photo Credits: Pixabay.com

नॅशनल टेस्टिंग एजंसी (NTA) द्वारा आज (26 ऑगस्ट) NEET Admit Card 2020 जारी करण्यात आली आहेत. परीक्षार्थींना ही अ‍ॅडमीट कार्ड्स ntaneet.nic.in या नॅशनल टेस्टिंग एजंसीच्या अधिकृत संकेतस्थळावरून थेट डाऊनलोड करता येणार आहेत. दरम्यान यंदा नीट परीक्षा 2020 चे आयोजन 13 सप्टेंबर दिवशी करण्यात आले आहे. एजंसी कडून यंदा 99% विद्यार्थ्यांना त्यांच्या प्राधान्यक्रमामध्ये पहिल्या असलेल्या परीक्षा केंद्राची उपलब्धता दिली जाईल असे सांगण्यात आले आहे. JEE (Main), NEET 2020 Exam Date and Schedule: जेईई (मुख्य) परीक्षा 1 ते 6 सप्टेंबर दरम्यान, तर नीट (युजी) ची परीक्षा 13 सप्टेंबर रोजी आयोजित; NTA कडून परिपत्रक जारी

यंदा नीट 2020 परीक्षेसाठी सुमारे 15.97 लाख विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोशल डिस्टन्सिंग पाळत सुरक्षित परीक्षा पार पडाव्यात म्हणून 2546 वरून 3843 परीक्षा केंद्र उपलब्ध करून दिली जाणार आहेत.

NEET Admit Card 2020 डाऊनलोड कसं कराल?

  • ntaneet.nic.in या NTA NEET च्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या.
  • NEET Admit Card 2020 link तुम्हांला होमपेज वर दिसेल.
  • नवीन विंडो ओपन होईल त्यावर अत्यावश्यक माहिती भरा.
  • सबमीट वर क्लिक करा तुमचं अ‍ॅडमीट कार्ड डाऊनलोड करण्यासाठी उपलब्ध होईल.

यंदा कोरोना संकटकाळात परीक्षा पार पडणार असल्याने विद्यार्थ्यांना सुरक्षेच्या दृष्टीने काही खबरदारी घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. विद्यार्थ्यांना फेस मास्क, सॅनिटायझर जवळ ठेवण्याचं, पिण्याच्या पाण्याची बाटली सोबत ठेवण्यास परवानगी असेल.

दरम्यान नीट 2020 ची परीक्षा दुपारी 2-5 दरम्यान पार पडेल. लेखी स्वरूपात ही परीक्षा होणार असून एकाच स्लॉटमध्ये पार पडणार आहे. भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणी बायोलीजी (बॉटनीआणि झुऑलॉजी) विषयाच्या 180 प्रश्नांचा समावेश असेल. यासाठी बहू पर्यायी प्रश्नावली दिली जाते.