Examination | (Image Used For Representational purpose Only | Photo Credits: Pixabay.com

केंद्रीय शिक्षण मंत्री डॉ. रमेश पोखरियाल यांनी आज ( 2 फेब्रुवारी) UGC NET exam 2021 च्या तारखा जाहीर केल्या आहेत.त्यांच्या ट्वीटनुसार, National Testing Agency यंदा 2, 3, 4, 5, 6, 7, 10, 11, 12, 14 आणि 17 मे 2021 दिवशी युजीसी नेट परीक्षा घेणार आहेत. या परीक्षेच्या माध्यमातून Junior Research Fellowship आणि Assistant Professor साठी उमेदवार निवडले जातात. दरम्यान ही परीक्षा पूर्णपणे कम्प्युटर बेस्ड टेस्टच्या माध्यमातून घेतली जाणार आहे तर याबाबतची अधिक माहिती, रजिस्ट्रेशन ugcnet.nta.nic.in वर उपलब्ध असेल. BARC Recruitment 2021: नर्स ते ड्रायव्हर बीएआरसी मध्ये 63 जागी नोकरभरतीसाठी barc.gov.in वर करा 15 फेब्रुवारी पूर्वी अर्ज.

आजपासूनच UGC NET 2021 application process सुरू करण्यात आली आहे. इक्छुकांना आज 2 फेब्रुवारी पासून 2 मार्च 2021 पर्यंत ऑनलाईन अर्ज करण्याची मुभा असेल. तर अ‍ॅप्लिकेशन फी भरण्यासाठी 3 मार्च पर्यंत वेळ असेल. युजीसी नेट परीक्षा ही 3 तासांची असते. पेपर 1 हा 100 मार्कांचा तर पेपर 2 हा 200 मार्कांचा असतो. दरम्यान या परीक्षेबाबतच्या अधिक अपडेट्ससाठी अधिकृत संकेतस्थळाला भेट देत रहा.

ट्वीट

दरम्यान युजीसी नेट परीक्षेचं आयोजन हे कॉलेज आणि युनिव्हर्सिटीमध्ये असिस्टंट प्रोफेसर यांची पात्रता आणि ज्यूनियर रिसर्च फेलोशीप यांच्यासाठी केली जाते. आज डॉ. पोखरियाल यांनी परीक्षांच्या तारखांची माहिती देतानाच विद्यार्थ्यांना परीक्षांसाठी शुभेच्छा देखील दिल्या आहेत.